मार्ग दृश्य विश्वसनीय फोटोग्राफर धोरण
हे धोरण सर्व मार्ग दृश्य विश्वासू सहभागी व्यक्तींना लागू होते जे त्यांच्या ग्राहकांच्या वतीने Google उत्पादनांवर वापरण्यासाठी इमेजरी गोळा करतात.
आमच्या मार्ग दृश्य विश्वसनीय फोटोग्राफर धोरणामध्ये चार घटकांचा समावेश आहे:
- पारदर्शकतेच्या आवश्यकता: तुमच्या ग्राहकांसोबत तुम्हाला शेअर करायची असलेली माहिती
- प्रतिबंधित पद्धती: तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या वतीने Google उत्पादनांवर अपलोड केलेल्या इमेजरी प्रकाशित किंवा व्यवस्थापित करायच्या असल्यास, तुम्ही करू शकत नाही अशा गोष्टी
- ब्रँडिंग मार्गदर्शक तत्त्वे: Google ब्रँडिंग घटकांचा योग्य उपयोग काय आहे
- गुणवत्तेच्या आवश्यकता: तुम्ही तुमच्या ग्राहकांची Google जाहिरात खाती कशी व्यवस्थापित करावीत
पारदर्शकता आवश्यकता
ग्राहकांना Google उत्पादनांवर इमेजरी अपलोड करण्याच्या फायद्यांची पूर्णपणे जाणीव होण्यासाठी, त्यांच्याकडे माहितीपूर्वक निर्णय घेण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आमच्या सर्व विश्वासू सहभागी व्यक्तींना या निर्णयावर परिणाम करणारी माहिती प्रामाणिकपणे देणे आवश्यक आहे. खाली नमूद केलेल्या आवश्यकता पूर्ण करण्याव्यतिरिक्त ग्राहकांनी विनंती केल्यावर विश्वासू सहभागी व्यक्तींनी त्यांना इतर संबंधित माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
इतरांना तुमच्या फोटोग्राफीसंबंधित सेवा विकताना तुम्ही याच पारदर्शकतेचे पालन करणे आणि इतर लोक, ब्रँड व स्थानिक कायदे यांच्याशी संबंधित तुमची कर्तव्ये आणि अधिकार समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सेवा शुल्क आणि किमती
विश्वसनीय प्रोग्राममधील सहभागी ते पुरवत असलेल्या मौल्यवान सेवांसाठी नेहमी व्यवस्थापन शुल्क आकारतात आणि इमेजरी खरेदीदारांना ही शुल्क आकारली जाणार आहेत की नाही हे माहीत असणे आवश्यक आहे. कमीतकमी, प्रत्येक पहिल्या विक्रीपूर्वी नवीन ग्राहकांना लेखी माहिती द्या आणि ग्राहक इन्व्हॉइसवर तुमच्या शुल्क आणि किमतींबद्दल सांगा.
मार्ग दृश्य च्या विश्वासू फोटोग्राफरसोबत काम करताना त्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात हे माहीत असणे विशेषतः कमी बजेट असलेल्या इमेजरी खरेदीदारांसाठी महत्त्वाचे आहे, ज्यांच्याकडे मोठ्या इमेजरी खरेदीदारांइतकी संसाधने किंवा कौशल्ये नाहीत.
प्रामाणिक प्रतिनिधित्व
मार्ग दृश्याच्या विश्वसनीय प्रोग्रामचे सहभागी म्हणून, तुम्ही स्वत:चे प्रतिनिधित्व अशा प्रकारे करू नये ज्यामुळे तुम्ही Google चे कर्मचारी असल्याचे सूचित होईल. स्वत:ला प्रामाणिकपणे एक पूर्णतः स्वतंत्र व्यावसायिक म्हणून सादर करा आणि क्लायंटना Google ची भूमिका प्रकाशन सेवा म्हणून मर्यादित असल्याचे कळवा.
वैयक्तिक जबाबदारी
प्रकाशित केलेल्या इमेज साधारणपणे काही सेकंदांत Google Maps वर दिसतात, पण नंतर या इमेजनी Maps वापरकर्त्याने योगदान दिलेल्या आशयाचे धोरण किंवा Google Maps सेवा अटी यांचे पालन न केल्यास, त्या नाकारल्या जाऊ शकतात.
- कमाई करण्याच्या हेतूने पुरवलेली इमेजरी Google Maps वरून काढून टाकल्यास, समस्येचे निराकरण करणे ही फोटोग्राफर आणि व्यवसाय मालकाची जबाबदारी आहे.
- आम्ही शिफारस करतो, की आमच्या धोरणांच्या विरोधात असलेल्या इमेजमध्ये फोटोग्राफरने तातडीने सुधारणा करावी किंवा त्या बदलाव्यात आणि त्या Google Maps साठी मंजूर केल्या गेल्याची खात्री करावी अन्यथा समस्येचे निराकरण करणे शक्य नसल्यास, त्यांच्या क्लायंटना संपूर्ण परतावा द्यावा.
इमेज मालकी
आम्ही शिफारस करतो, की फोटोग्राफर आणि व्यवसाय मालक एकत्र येतात, तेव्हा दोन्ही पक्षांनी करारनाम्याच्या अटी, वॉरंटी व भविष्यातील मालकी हक्क नमूद करणारा लेखी करार करावा.
- शूट पूर्ण झाल्यानंतर इमेजरीची मालकी कोणाकडे असेल ते निश्चित करा. फोटोग्राफर मालकी राखून ठेवणार असल्यास, फोटोग्राफरच्या कॉपीराइटचे उल्लंघन न करता व्यवसाय मालक इमेजरीचा वापर कशा प्रकारे करू शकतो हे त्यांना माहीत असल्याची खात्री करा. एकच इमेज दोन खात्यांमधून (जसे की फोटोग्राफर आणि व्यवसाय मालकांची खाती) दोनदा प्रकाशित केली जाऊ नये.
कायद्याचे पालन
क्लायंटना सेवा देताना सर्व कायद्यांचे पालन करत असल्याची खात्री करा. तुमचे कौशल्य किंवा तुम्ही करत असलेल्या कामाच्या अंतिम गुणवत्तेबाबत दिशाभूल करू नका. तसेच ज्या कामासाठी तुम्हाला नियुक्त केले गेले आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे योग्य तो विमा असल्याची खात्री करा.
इमेज दृश्यमानता
व्यवसाय मालक आणि फोटोग्राफर यांच्यामधील करारांच्या समावेशासह तृतीय पक्षांमधील कोणतेही कंत्राटी किंवा व्यावसायिक करार विचारात न घेता Google हे Google Maps वर इमेजना रँक करेल. व्यवसाय मालकाने व्यावसायिक फोटोग्राफरला शूटसाठी पैसे दिले असले, तरीही Google Maps वर इमेजरीला कसे रँक केले जाईल किंवा ती कशी दिसेल यावर परिणाम होणार नाही.
स्वारस्यासंबंधित विवाद नाही
काही Google कार्यक्रमांमध्ये विशेषतः स्थानिक मार्गदर्शक यामध्ये तुम्ही व्यावसायिक म्हणून नाही पण सामान्य व्यक्ती म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे (उदा. तुम्हाला तुम्ही योगदान दिलेल्या आशयासाठी मोबदला मिळत नाही). तुम्ही भाड्याने सेवा पुरवत असल्यास, (जसे की मार्ग दृश्य विश्वासू पुरवठादार म्हणून स्वतःचे मार्केटिंग करणे) तुम्ही व्यावसायिक सेवांना निष्पक्षपणे काम करणार्या इतर कोणत्याही ना–व्यावसायिक सेवांमध्ये एकत्रित करू शकत नाही (जसे की स्थानिक मार्गदर्शक म्हणून रेटिंग किंवा परीक्षण पोस्ट करण्याची तुमची क्षमता).
Google ब्रँड चा योग्य वापर
ज्या फोटोग्राफर किंवा कंपन्यांनी विश्वसनीय स्थान मिळवले आहे फक्त तेच Google Maps मार्ग दृश्य ब्रँड आणि विश्वसनीय बॅज हे मार्केटिंगची मालमत्ता म्हणून वापरू शकतात. एक विश्वासू फोटोग्राफर म्हणून, तुमच्या विशेष स्थितीचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. Google Maps, मार्ग दृश्य किंवा इतर कोणत्याही संबंधित लोगोंच्या समावेशासह विश्वासू प्रो हे विश्वसनीय बॅज, वर्ड मार्क आणि ब्रँडिंग घटकांचा वापर करू शकतात. त्यांच्यासोबत तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता आणि करू शकत नाही त्या खालीलप्रमाणे आहेत. कोणीतरी Google ची परवानगी असलेल्या आमच्या ब्रँड मालमत्तांच्या वापराचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटल्यास, तुम्ही येथे समस्येचा अहवाल देऊ शकता. इतर Google ब्रँड, मालमत्तांसाठी, तुम्ही अयोग्य वापरांचा अहवालयेथे देऊ शकता.
विश्वसनीय बॅजचा वापर
- तुम्ही मार्ग दृश्य विश्वसनीय प्रोग्रामचे प्रमाणित सदस्य असाल तरच विश्वसनीय बॅज आणि ब्रँडिंग घटक वापरा.
- तुम्ही विश्वसनीय बॅज कुठेही दाखवत असलात तरीही तो पुरेशा पॅडिंगसह फक्त पांढर्या बॅकग्राउंडवर दाखवावा.
- विश्वसनीय बॅज फक्त तुमचे नाव किंवा कंपनीचे नाव आणि लोगोसहित एकत्रित वापरा.
- तुम्ही वेबसाइट, सादरीकरणे, व्यवसाय अॅपरेल आणि प्रिंट केलेल्या विक्री वस्तूंमध्ये विश्वसनीय बॅज आणि ब्रँडिंग घटक वापरू शकता.
- बॅज आणि ब्रँडिंग घटक पेज/कपड्यावरील सर्वात प्रमुख घटक नसल्याची खात्री करा.
- कोणतेही ग्राफिक जोडणे, इमेज स्ट्रेच करणे किंवा त्यांचे भाषांतर करणे यांच्या समावेशासह Google Maps, मार्ग दृश्य किंवा विश्वसनीय बॅज यांच्या कोणत्याही लोगो किंवा वर्डमार्कमध्ये बदल करू नका.
- दिशाभूल करेल किंवा अपमानास्पद वाटेल अशा प्रकारे बॅज वापरू नका. उदाहरणार्थ, कोणत्याही उत्पादन किंवा सेवेला Google चा पाठिंबा असल्याचे सूचित होईल अशा प्रकारे बॅज वापरणे.
तुमच्या सेवांची विक्री करताना
- तुमच्या व्यवसाय सेवांपैकी एक म्हणून व्यावसायिक 360 फोटो ऑफर करा.
- व्यवसायांशी संवाद साधताना तुम्ही विश्वसनीय कार्यक्रमाचा भाग असल्याचे चुकीचे सादरीकरण करू नका किंवा ते लपवू नका.
- तुमच्या स्थानिक मार्गदर्शकाच्या सदस्यत्वासह तुम्ही भाड्याने देण्यासाठी ऑफर केलेल्या कोणत्याही सेवा (जसे की मार्ग दृश्य विश्वासू पुरवठादार म्हणून स्वतःचे मार्केटिंग करणे) एकत्रित करू नका.
तुमच्या वेबसाइटचे ब्रँडिंग करणे
- डोमेन नेममध्ये Google, Google Maps, मार्ग दृश्य, विश्वसनीय बॅज किंवा इतर कोणतेही Google ट्रेडमार्क अथवा त्याच्याशी मिळतेजुळते काही वापरू नका.
- तुम्ही तुमच्या वेबसाइटवर विश्वसनीय बॅज दाखवू शकता.
तुमच्या वाहनाचे ब्रँडिंग
- तुम्ही एखाद्या वाहनावर ग्राफिक दाखवताना फक्त तुमचा स्वतःचा ब्रँड आणि लोगो वापरा.
- मार्ग दृश्य आयकन, बॅज आणि वाहनावरील लोगो यांच्या समावेशासह कोणतेही Google ब्रँडिंग घटक दाखवू नका.
360 इमेजच्या सर्वात वरती/खालती असलेले ब्रँडिंग
- उपलब्ध असलेल्या जागेनुसार सर्वात वरती/खाली तुमच्या कंपनीचा लोगो/नाव वापरा. विशिष्ट फॉरमॅटशी संबंधित कोणत्याही निकषांसाठी धोरण मार्गदर्शक तत्त्वे पाहा.
- तुमच्या इमेजरीच्या सर्वात खालती किंवा तुमच्या वाहनाच्या छतावरती ब्रँडिंगचा समावेश करताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
- ब्रँडिंगचा वापर करण्याची परवानगी असणे आवश्यक आहे.
- फक्त उपयुक्त असलेला (उदाहरणार्थ, स्थानिक पर्यटनाचा प्रचार करणे) किंवा विशेषतांपुरता मर्यादित असलेला आशय दाखवा.
- प्रायोजकत्व/नामोल्लेखांच्या बाबतीत, दाखवलेल्या ब्रँडिंगने पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:
- Google ब्रँड मालमत्तेचा समावेश नसावा.
- (दाखवलेल्या स्थानाशी संबंधित नसल्यास) कोणत्याही जाहिरात ग्राफिक किंवा प्रचारात्मक भाषेचा समावेश नसावा.
- "यांच्याद्वारे प्रायोजित केलेले" असा किंवा अशा प्रकारच्या भाषांतराचा समावेश असावा.
- (कदाचित तुमच्या कॅमेरामध्ये दिसणाऱ्या छतावरील ग्राफिकच्या समवेशासह) तुमच्या 360 इमेजच्या सर्वात वरती/खालती विश्वसनीय बॅज किंवा इतर कोणतेही Google ब्रँडिंग वापरू नका.
या मार्गदर्शक तत्त्वांच्या व्यतिरिक्त, कृपया तुम्ही Google चे योग्य वापराचे नियम, ब्रँड अटी आणि नियम, भौगोलिक वापर मार्गदर्शक तत्त्वे आणि Google ट्रेडमार्कच्या इतर सर्व वापर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याची खात्री करा.
Google जाहिराती वर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणे
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या जाहिरातींमध्ये 'विश्वसनीय फोटोग्राफर प्रोग्राम' ही संज्ञा वापरून Google Ads वर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. कृपया लक्षात ठेवा, की तुम्हाला खुद्द "मार्ग दृश्य" ब्रँडमध्ये किंवा तुमच्या जाहिरातींमध्ये कोणताही इतर Google ब्रँड वापरण्याची अनुमती नाही.
तुमच्या Google Business Profile चे ब्रँडिंग करणे
तुमच्याकडे Google Business Profile असल्यास, तुम्ही Google Business Profile धोरणे आणि विशेषतः Google वर तुमचा व्यवसाय सादर करण्याची मार्गदर्शक तत्त्वे यांचा आदर करणे अपेक्षित आहे.
तुमच्या Google Business Profile च्या नावामध्ये Google, Google Maps, मार्ग दृश्य किंवा इतर कोणतेही Google ट्रेडमार्क अथवा त्याच्याशी मिळतेजुळते काही वापरू नका.
तुम्हाला विश्वसनीय स्टेटस मिळाल्यास, तुम्ही तुमचा विश्वसनीय बॅज तुमच्या प्रोफाइलवर अपलोड करू शकता.
टीप: तुम्ही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास, तुम्ही प्रोग्राममधील तुमचे स्थान आणि विश्वसनीय बॅज व इतर ब्रँडिंग घटक वापरण्याचा अधिकार गमावू शकता.
विश्वसनीय इमेजरी गुणवत्तेच्या आवश्यकता
इमेज गुणवत्ता
- ७.५ MP किंवा त्यापेक्षा मोठी (३,८४० x १,९२० px)
- २:१ इमेज आस्पेक्ट रेशो
- कडांभोवती इमेजमध्ये कोणत्याही रिकाम्या जागा नसाव्यात
- कोणत्याही महत्त्वाच्या स्टिचिंग एरर नसाव्यात
- फिकट/गडद भागांमध्ये पुरेसा तपशील असावा
- शार्पनेस: मोशन ब्लर नसावा, फोकस असावा
- इमेज अधोबिंदूमध्ये असण्यासह, लक्ष विचलित करणारे कोणतेही इफेक्ट किंवा फिल्टर नसावेत
कनेक्टिव्हिटी
- कनेक्ट केलेल्या सर्व 360 फोटोमधील गोष्टी स्पष्टपणे दृश्यमान असाव्यात
- आतमधील शूट करताना एक मीटर आणि बाहेर असताना तीन मीटर अंतर ठेवा
- तुमचा संग्रह सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून आमच्याशी जोडले जाण्याची शक्यता वाढवा
योग्यता
- लोक आणि ठिकाण दाखवण्याची संमती
- भौगोलिकदृष्ट्या अचूक स्थान नियोजन
- इमेज मिररिंग किंवा वार्पिंगसह, कॉंप्युटरने जनरेट केलेल्या स्पेस किंवा स्पेशल इफेक्ट नसावेत
- अधोबिंदूच्या भागापलीकडे नामोल्लेख नसावा
- कोणताही द्वेषपूर्ण किंवा बेकायदेशीर आशय नसावा
प्रतिबंधित पद्धती
अनुचित आशय
प्रतिबंधित आणि मर्यादित आशय Maps वापरकर्ता योगदान दिलेल्या आशयाचे धोरण यामध्ये आढळू शकतो.
तुम्ही "समस्येची तक्रार नोंदवा" ही लिंक वापरून अयोग्य आशयाची तक्रार नोंदवू शकता.
खोटे, दिशाभूल करणारे किंवा अवास्तव दावे
मार्ग दृश्य विश्वासू फोटोग्राफरच्या ग्राहकांनी मार्ग दृश्य विश्वासू फोटोग्राफरसोबत काम करण्याबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावेत असे आम्हाला वाटते याचा अर्थ असा, की तुम्ही तुमची कंपनी, तुमच्या सेवा, त्या सेवांशी संबंधित खर्च आणि तुमच्या ग्राहकांना अपेक्षित असलेले परिणाम यांचे वर्णन करताना स्पष्ट व प्रामाणिक असणे आवश्यक आहे. खोटे, दिशाभूल करणारे किंवा अवास्तव दावे करू नका.
उदाहरणे:
- Google सह खोट्या संलग्नतेचा दावा करणे
- Google मार्ग दृश्य किंवा Google Maps वर सर्वात वरती स्थान नियोजित करण्याची हमी देणे
त्रासदायक, गैरवर्तन किंवा अविश्वासू वर्तणूक
मार्ग दृश्य क्लायंटना मार्ग दृश्य फोटोग्राफरकडून तितकीच उत्कृष्ट सेवा मिळायला हवी जितकी थेट Google सोबत काम करताना त्यांना मिळेल. संभाव्य किंवा आधीपासून असलेल्या ग्राहकांवर त्रासदायक, अपमानास्पद किंवा अविश्वसनीय युक्त्या वापरू नका.
उदाहरणे:
- संभाव्य ग्राहकांना सतत कोल्ड-कॉलिंग करणे
- एखाद्या जाहिरातदारावर साइन अप करण्यासाठी किंवा तुमच्या एजन्सीसोबत काम करत राहाण्यासाठी विनाकारण दबाव आणणे
- तुमच्या वतीने इतरांना Google प्रमाणीकरण परीक्षा देण्यास भाग पाडणे
- फिशिंग
- पेमेंटच्या बदल्यात Google जाहिराती व्हाउचर ऑफर करणे
आमच्या धोरणांबद्दल
तुम्ही Google च्या मार्ग दृश्य विश्वासू फोटोग्राफर धोरणाबद्दल जाणून घेणे आणि त्याबाबत अप टू डेट राहणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करत आहात असे आम्हाला वाटल्यास, आम्ही तुमच्या पद्धतींचे सविस्तर पुनरावलोकन करण्यासाठी आणि सुधारात्मक क्रियेची विनंती करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू. वारंवार किंवा धोरणाचे विशेषत: गंभीररीत्या उल्लंघन केल्यास, आम्ही तुम्हाला विश्वासू प्रोग्राममधून काढून टाकू शकतो आणि तुमच्या ग्राहकांना त्यानुसार सूचित करण्यासाठी संपर्क साधू शकतो. आम्ही तुम्हाला Google Maps उत्पादनांमध्ये योगदान देण्यापासूनदेखील प्रतिबंधित करू शकतो.
खाली दिलेल्या गोष्टींच्या समवेशासह, या धोरणांचा अस्तित्वात असलेल्या कोणत्याही अटी आणि धोरणांबरोबर समावेश आहे जी तृतीय पक्षांना लागू होऊ शकतात:
तुम्ही धोरणाचे उल्लंघन केल्यास, काय होते
पालन करण्यासंबंधी पुनरावलोकन: तुम्ही मार्ग दृश्य विश्वासू फोटोग्राफर धोरणाचे पालन करत असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही तुमच्या व्यवसायाचे कधीही पुनरावलोकन करू शकतो. आम्ही पालनासंबंधी माहितीची विनंती करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधल्यास, तुम्ही वेळेवर प्रतिसाद देणे आवश्यक आहे आणि आमच्या धोरणांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुधारात्मक कृती तातडीने करणे आवश्यक आहे. पालन करण्यासंबंधी पडताळणी करण्यासाठी आम्ही तुमच्या ग्राहकांशीदेखील संपर्क साधू शकतो.
पालन न करण्यासंबंधी सूचना: तुम्ही मार्ग दृश्य विश्वासू फोटोग्राफर धोरणाचे उल्लंघन करत आहात असे आम्हाला वाटल्यास, आम्ही सामान्यतः सुधारात्मक कृती करण्याची विनंती करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू. तुम्ही दिलेल्या कालावधीत विनंती केलेल्या सुधारणा न केल्यास, आम्ही अंमलबजावणीसंबंधित कारवाई करू. गंभीर किंवा वारंवार उल्लंघने झाल्यास, आम्ही त्वरित आणि सूचनेशिवाय कारवाई करू शकतो.
तृतीय पक्ष प्रोग्राम निलंबन: तुमचा Google मार्ग दृश्य विश्वसनीय यांसारख्या Google तृतीय पक्ष प्रोग्राममधील सहभाग मार्ग दृश्य विश्वासू फोटोग्राफर धोरणाचे पालन यावर आधारित असतो आणि तुम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास किंवा तुमचा व्यवसाय पालन करत असल्याची खात्री करण्यासाठी त्याचे परीक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना सहकार्य न केल्यास, तुमचा सहभाग मर्यादित किंवा निलंबित केला जाऊ शकतो.
Maps खाते निलंबन: तुम्ही एखाद्या धोरणाचे गंभीर उल्लंघन केल्यास, आम्ही तुमचे Google Maps खाते निलंबित करू शकतो. वारंवार किंवा धोरणाचे विशेषत: गंभीर उल्लंघन केल्यास, तुमची Google Maps खाती कायमची निलंबित केली जातील आणि तुम्ही यापुढे Google Maps वर योगदान देऊ शकणार नाही. याव्यतिरिक्त, आम्ही तुमच्या ग्राहकांना त्या अनुषंगाने सूचित करण्यासाठी संपर्क साधू.
तृतीय पक्ष धोरणाच्या उल्लंघनाची तक्रार नोंदवा
तृतीय पक्ष भागीदार या धोरणाचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटते का? आम्हाला कळवा: