Jump to Content

Google हे तुम्हाला तुमच्या सभोवतालचे जग डिस्कव्हर करण्यात आणि ते रंजक, क्रीएटिव्ह मार्गांनी एक्सप्लोर करण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवरील इमेजरीचा उद्देश आमचा Maps अनुभव वर्धित करणे हा आहे, ज्यामुळे तुम्हाला जवळपासच्या किंवा जगभरातील ठिकाणांचे पूर्वावलोकन करण्यात आणि ती एक्सप्लोर करण्यात मदत होते. ही इमेजरी उपयुक्त असल्याची आणि आमचे वापरकर्ते एक्सप्लोर करत असलेल्या जगाचे प्रतिबिंब असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही अत्यंत काटेकोर प्रयत्न करतो.

आमची इमेजरी AI द्वारे कल्पक नवीन अनुभवांनादेखील सपोर्ट करते. हे तुम्हाला नावीन्यपूर्ण डिजिटल आशयाद्वारे जग एक्सप्लोर करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे सर्जनशीलता आणि डिस्कव्हरीच्या नवीन पद्धतींना चालना मिळते. Google हे आमच्या गोपनीयतेच्या वचनबद्धतेनुसार AI सह या इमेजरीचा वापर जबाबदारीने करण्यासाठी कटिबद्ध आहे.

मार्ग दृश्य इमेजरीला बाह्य पक्ष किंवा Google द्वारे योगदान दिले जाऊ शकते. यामधला फरक तुम्ही प्रत्येक इमेजरीसोबत सादर करण्यात आलेले नामोल्लेख किंवा आयकनवरून ओळखू शकता. बाह्य पक्षाने कॅप्चर केलेली आणि Google Maps वर प्रकाशित केलेली इमेज त्या योगदानकर्त्याची (किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या एखाद्या उत्तराधिकाऱ्याची) मालमत्ता असते.

हे पेज Google ने योगदान दिलेले मार्ग दृश्य इमेजरी धोरण सेट करते. वापरकर्त्याने योगदान दिलेल्या मार्ग दृश्य इमेजरीसाठी, कृपया Maps वापरकर्त्याने योगदान दिलेल्या आशयाचे धोरण पहा.

Google ने योगदान दिलेले हे मार्ग दृश्य इमेजरी धोरण

मार्ग दृश्य इमेजरी पाहणाऱ्या प्रत्येकास सकारात्मक, फायदेशीर अनुभव येईल याची खात्री करण्यासाठी आम्ही Google ने योगदान दिलेले हे मार्ग दृश्य धोरण विकसित केले आहे. ते आम्ही अयोग्य आशय कसा हाताळतो आणि Google Maps वर मार्ग दृश्य इमेजरी प्रकाशित करताना कोणते निकष वापरतो हे स्पष्ट करते. आम्ही अधूनमधून आमची धोरणे अपडेट करू शकतो, त्यामुळे कृपया ते वेळोवेळी तपासत राहा.

मार्ग दृश्य इमेजरी रीअल टाइम नाही

मार्ग दृश्य इमेजरी आमचे कॅमेरा त्या स्थानावरून त्या दिवशी जाताना जे पाहू शकले फक्त तेच दाखवते. त्यानंतर, त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक महिने लागतात. याचा अर्थ असा, की तुम्ही पाहत असलेला आशय कदाचित काही महिन्यांपूर्वीचा किंवा काही वर्षे जुना असू शकतो. काही स्थानांवर, जेथे आम्ही गेली अनेक वर्षे इमेजरी गोळा केलेल्या आहेत तेथे तुम्हालादेखील त्या इमेजरीमधील बदल आमच्या टाइम मशीन फंक्शनमधून पाहता येतील.

गोपनीयता, ब्लर करणे आणि AI साठी इमेजरीचा वापर

मार्ग दृश्य इमेजरीमधील व्यक्तींच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी Google Maps अंतर्गत आणि नवीन AI क्षमता विकसित करण्यासाठी, अशा दोन्ही वेळी आम्ही ती इमेजरी वापरतो, तेव्हा Google अनेक पावले उचलते.

ऑटोमॅटिक गोपनीयता संरक्षणे: मार्ग दृश्य मध्ये Google ने योगदान दिलेल्या इमेजरीमधील ओळखता येणारे चेहरे आणि लायसन्स प्लेट ब्लर करण्यासाठी डिझाइन केलेले चेहरा आणि लायसन्स प्लेट ब्लर करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे.

जनरेटिव्ह AI साठी मार्ग दृश्य चा वापर: आमच्या वापरकर्त्यांना आणि भागीदारांना वास्तविक जगातील दृश्यांना रीइमॅजिन करणारा नावीन्यपूर्ण डिजिटल आशय जनरेट करण्यात मदत करणे यांसारखी मौल्यवान टूल पुरवण्यासाठी आमची प्रभावी जनरेटिव्ह AI मॉडेल (जसे की Gemini, Nano Banana आणि Veo) प्रशिक्षित आणि प्रॉम्प्ट करण्यासाठी आम्ही मार्ग दृश्य इमेजरी वापरतो. जनरेटिव्ह प्रॉम्प्टिंगसाठी वापरलेली इमेजरी ही आमची गोपनीयतेसंबंधी कठोर मानके कायम ठेवण्याकरिता आणि AI द्वारे जनरेट केलेल्या इमेजरीमधील वैयक्तिकरीत्या ओळखता येणारी व संवेदनशील माहिती दिसणे कमी करण्याकरिता, उदाहरणार्थ संपूर्ण शरीरे आणि वाहने काढून टाकणे, यांसारख्या अतिरिक्त ऑटोमेटेड फिल्टरमधून जाते.

अतिरिक्त ब्लर करण्याची विनंती करणे: तुम्हाला तुमचा चेहरा किंवा लायसन्स प्लेट आणखी ब्लर करायची असल्यास अथवा तुमचे संपूर्ण घर वा कार किंवा शरीर आम्ही ब्लर करावे असे तुम्हाला वाटत असल्यास, "समस्येची तक्रार करा" हे टूल वापरून विनंती सबमिट करा. प्रकाशित मार्ग दृश्य इमेजच्या सर्व कॉपीवर ब्लर लागू करून आम्ही या विनंत्या मान्य करतो.

ब्लर करणे आणि AI द्वारे जनरेट केलेला आशय: आम्हाला ब्लर करण्याची नवीन विनंती मिळाल्यावर आणि ती लागू केल्यावर, तिथून पुढे नव्याने ब्लर केलेली मार्ग दृश्य इमेज जनरेटिव्ह AI प्रॉम्प्टिंगमधून वगळली जाईल याचीदेखील आम्ही खात्री करतो, जेणेकरून तुमच्या गोपनीयतेच्या निवडीचा मान राखला जाईल. मात्र, तृतीय पक्षांनी यापूर्वी तयार केलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या AI द्वारे जनरेट केलेल्या इमेजरीवर ब्लर करण्याच्या नवीन विनंत्यांचा कोणताही परिणाम होत नाही.

अनुचित आशय

तुम्ही "समस्येची तक्रार करा" लिंक वापरून अयोग्य आशयाची तक्रार करू शकता. कलात्मक, शैक्षणिक किंवा माहितीपर मूल्य वगळता आम्ही पुढील वर्गवाऱ्यांना अयोग्य आशय समजतो.

बौद्धिक मालमत्ता उल्लंघने

कोणाच्याही कायदेशीर अधिकारांचे, तसेच कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्या इमेज किंवा इतर कोणत्याही आशयाला आम्ही अनुमती देत नाही. अधिक माहितीसाठी किंवा DMCA विनंती दाखल करण्यासाठी, आमच्या कॉपीराइट प्रक्रियांचे पुनरावलोकन करा.

भडक लैंगिक आशय

आम्ही लैंगिकदृष्ट्या भडक आशयाला अनुमती देत नाही.

बेकायदेशीर, धोकादायक किंवा हिंसक आशय

मुळातच बेकायदेशीर असणाऱ्या, धोकादायक किंवा गुन्हेगारी कृत्ये प्रमोट करणाऱ्या अथवा ग्राफिक किंवा अकारण हिंसा समाविष्ट असलेल्या आशयाला आम्ही अनुमती देत नाही.

त्रास देणे आणि धोके

लोकांना त्रास, धमकी देण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मार्ग दृश्य चा वापर करत असलेल्या आशयाला आम्ही अनुमती देत नाही.

द्वेषयुक्त भाषण

आम्ही अशा आशयाला अनुमती देत नाही जो वंश, वांशिक मूळ, धर्म, भिन्नक्षमता, लिंग, वय, राष्ट्रीयत्व, ज्येष्ठत्व, लैंगिक प्राधान्य किंवा लिंगाधारित ओळखीच्या आधारावर व्यक्ती अथवा गटांविरुद्ध हिंसाचाराला प्रमोट करतो अथवा पाठिंबा देतो.

दहशतवादी आशय

दहशतवादी संघटनांचे इतर कोणतेही हेतू, तसेच भरती यांसाठी ही सेवा वापरण्याची आम्ही अनुमती देत नाही. आम्ही दहशतवादी कृत्यांना, हिंसेला उत्तेजन देणारा किंवा दहशतवादी हल्ले प्रमोट करणारा दहशतवादाशी संबंधित आशयदेखील काढून टाकू.

लहान मूल धोक्यात सापडण्‍याची स्‍थिती

लहान मुलांचे शोषण किंवा गैरवापर करणाऱ्या आशयाविरुद्ध Google चे शून्य सहिष्णुता धोरण आहे. यात लैंगिक गैरवर्तनाच्या सर्व इमेज आणि लैंगिक रीतीने लहान मुलांना सादर करणार्‍या सर्व आशयाचा समावेश आहे. अशा रीतीने लहान मुलांचे शोषण करत आहे असा वाटणारा कोणताही आशय तुम्हाला आढळल्यास, तुमचा उद्देश या आशयाकडे Google चे लक्ष वेधणे हा असला, तरी कृपया तो पुन्हा शेअर करू नका किंवा त्याच्यावर टिप्पणी करू नका. तुम्हाला इंटरनेटवर इतरत्र असा आशय आढळल्यास, कृपया नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅंड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन (NCMEC) यांच्याशी थेट संपर्क साधा.

वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती

तुमचे किंवा इतरांचे क्रेडिट कार्ड तपशील, वैद्यकीय माहिती किंवा सरकारद्वारे जारी ओळखपत्र यांसारख्या वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहितीचा समावेश असलेल्या आशयाला आम्ही अनुमती देत नाही.