तुमची स्वतःची मार्ग दृश्य इमेज तयार करा आणि प्रकाशित करा
नवीन परिसर, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली ठिकाणे आणि स्थानिक व्यवसाय कॅप्चर करणे कधीच इतके सोपे नव्हते. फक्त तुमचा कॅमेरा निवडा, तुमचे 360 व्हिडिओ गोळा करा आणि मार्ग दृश्य स्टुडिओ वर अपलोड करा.
जगभरातील प्रेक्षकांना तुमचा परिसर, तुमचा सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक व्यवसाय दाखवा.
शहरांना रस्त्यांवरील ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्यात, पायाभूत सुविधांच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यात, देखभालीचे काम ऑप्टिमाइझ करण्यात आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांमध्ये मदत करा.
पायवाटा आणि अॅक्सेसिबिलिटी पॉइंट मॅप करून पर्यटक अनुभवामध्ये सुधारणा करा.
तुमची 360 इमेजरी जगभरात प्रकाशित करण्यासाठी फक्त तीन पायऱ्या
मार्ग दृश्य कंपॅटिबल कॅमेराने मार्ग, पायवाटा, पर्यटन स्थळे आणि व्यवसाय कॅप्चर करा. तुमचा मार्ग Google Maps वर अस्तित्वात
नसल्यास, आमच्या Google Maps आशय भागीदार पेजवर डेटा व्यवस्थापित करण्याचे किंवा त्यासाठी योगदान देण्याचे इतर मार्ग पहा.
*Note that Google does not certify any operational or mechanical functions. Any specific technical or logistical issues should be addressed directly with the supplier.
ड्राइव्हवर, राइडवर जाताना किंवा चालताना तुमचा कॅमेरा सोबत न्या
प्रवासात वाहन चालवत असताना तुमची 360 इमेजरी तयार करा. तुमचा मार्ग मॅप करताना वाहन किंवा हेल्मेट माउंट कॅमेरा वापरा अथवा तुम्ही इनडोअर इमेजरी तयार करत असल्यास, तुमचा कॅमेरा मिनि ट्रायपॉड किंवा मोनोपॉडच्या मदतीने माउंट करा.
एकाच वेळी एकाहून अधिक फाइल अपलोड करा आणि अपलोड पूर्ण होण्यापूर्वी तुमच्या इमेजचे पूर्वावलोकन करा. तुमच्या 360 इमेजरीशी संबंधित आकडेवारी अॅक्सेस करा आणि भविष्यात जेथील इमेजरी कॅप्चर करायची आहे अशा मार्गांची योजना सहजपणे आखा.
सार्वजनिक आणि पर्यटन संस्था या त्यांच्या गंतव्यस्थानांच्या जगभरातील दृश्यमानतेमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दृश्य कशा वापरत आहेत ते जाणून घ्या.
मार्ग दृश्य वापरून स्थानिक समुदायांना सक्षम करत आहे
२०१९ मध्ये फोटोग्राफरच्या एका गटाने झांझिबार मॅप करण्यास सुरुवात केली. या प्रोजेक्टमुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाबद्दल अधिक जाणून घ्या.
फ्रेंच पॉलिनेशियाची बेटे कॅप्चर करणारी सर्व भूप्रदेशांवर चालणारी वाहने
फ्रेंच पॉलिनेशियाची इमेजरी नकाश्यावर आणण्यासाठी एका स्थानिक फोटोग्राफरने गोल्फ कार्ट, जेट स्की आणि घोडे यांसारख्या गोष्टी कल्पकतेने वापरल्या, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रथम प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक लोकांना त्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यात मदत झाली.
देश मॅप करण्यासाठी, स्थानिक लोकांना मार्ग दृश्य संदर्भात शिक्षित करण्यासाठी आणि हा प्रोजेक्ट पुढे सुरू ठेवण्याकरिता त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने WT360 सह काम केले.
म्यानमार डिजिटाइझ करत आहे आणि त्याचा सांस्कृतिक वारसा जतन करत आहे
एका व्हर्च्युअल रीअॅलिटी निर्मिती कंपनीने देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी मार्ग दृश्य वापरून म्यानमार डिजिटाइझ करण्यास कशी सुरुवात केली ते एक्सप्लोर करा.
तवांडा कनहेमा हे त्यांचा देश मॅप करत आहेत. त्यांनी व्हिक्टोरिया फॉल्सची इमेजरी कशी कॅप्चर केली आणि ते आणखी अनेक स्थाने मार्ग दृश्य वर कसे आणत आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
स्थानिक मार्गदर्शक केन्याचे सौंदर्य जगासमोर आणत आहेत
केन्या मॅप करण्यासाठी आणि त्याचे सौंदर्य जगासमोर आणण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक व प्रोफेशनल फोटोग्राफर एकत्र काम करत आहेत. त्यांच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या.
बर्मुडाची ऑनलाइन उपस्थिती ऑप्टिमाइझ करण्यासाठी, स्थानिक व्यवसाय शोधास चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना त्यांच्या प्रवासाची योजना आखण्यात मदत करण्यासाठी बर्मुडा टूरिझम ऑथोरिटी व माइल्स पार्टनरशिप यांनी एकत्र काम केले.
टोंगा आणि इतर पॅसिफिक बेटांची संस्कृती हायलाइट करण्यासाठी, संपूर्ण द्वीपसमूह मॅप करणे व तो मार्ग दृश्य वर जोडणे यांकरिता ग्रिड पॅसिफिक च्या संस्थापकांनी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.
तुमचा मार्ग Google Maps वर अस्तित्वात नसल्यास, आमच्या Google Maps आशय भागीदार पेजवर डेटा व्यवस्थापित करण्याचे किंवा त्यासाठी योगदान देण्याचे इतर मार्ग पहा.