छंदाकडून जागतिक मंचावर - फ्रेंच पॉलिनेशियाच्या सौंदर्याचे मॅपिंग केल्याने तेथील स्थानिक लोकांना अमाप फायदे कसे मिळाले.
फ्रेंच पॉलिनेशिया - शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे, हायकिंगसाठी चढ-उतार असलेले ट्रेल आणि UNESCO ची जागतिक वारसा स्थळे यांमुळे ते आवर्जून भेट देण्याचे लोकप्रिय गंतव्यस्थान बनले आहे. काही जण त्याबद्दलची स्वप्ने पाहण्यात गुंग असताना, क्रिस्टोफ कोरकॉड यांना मार्ग दृश्य वापरून नंदनवन घराजवळ आणण्याची आणि ताहितीच्या पर्यटन व्यवसायाची भरभराट होण्यात मदत करण्याची उत्तम संधी दिसली.
+४५०
तयार केलेल्या
व्यवसाय सूची
व्यवसाय आणि आनंद एकत्र करणे
मार्ग दृश्य ची आवड आणि फ्रेंच पॉलिनेशियाची देखणी बेटे यांपासून प्रेरणा घेऊन, क्रिस्टोफ यांनी २०१९ मध्ये Tahiti 360 ची स्थापना केली. हायकिंग ट्रेल आणि समुद्रकिनार्यांसह, फ्रेंच पॉलिनेशियामधील मोठ्या आउटडोअर स्थळांच्या 360 इमेजरीची फोटोग्राफी करणे आणि ती मार्ग दृश्य वर अपलोड करणे हे कंपनीचे वैशिष्ट्य आहे. बेटावरील जीवनाचे सौंदर्य कॅप्चर करणे आणि ते प्रदर्शित करणे यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत असतानाच, इमर्सिव्ह मार्ग दृश्य इनडोअर व्यवसाय दृश्यासह स्थानिक व्यवसायांना अधिक दृश्यमानता मिळवून देण्यात क्रिस्टोफ मदत करतात.
फ्रेंच पॉलिनेशियाचे मॅपिंग करणे
जवळपास सर्व गोष्टी डिजिटाइझ केल्या जात असतानाच्या काळात, क्रिस्टोफ आणि Tahiti 360 हे बेटावर येईपर्यंत फ्रेंच पॉलिनेशियाची फक्त उपग्रह दृश्ये उपलब्ध होती यावर विश्वास बसणे कठीण आहे. भरीस भर म्हणजे, बोरा बोरा आणि ताहितीसारख्या बेटांवरील रस्त्यांना कोणतीही नावे नव्हती, त्यामुळे आसपास फिरणे हे पर्यटकांप्रमाणे स्थानिक लोकांसाठीदेखील आव्हानच होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यामुळे अग्निशमन दल, प्रथम प्रतिसाद देणारे आणि कायदा अंमलबजावणी संस्था यांसारख्या आणीबाणीमधील सेवांचे काम कठीण बनले होते.
मला नेहमी वाटायचे, की मार्ग दृश्य मध्ये स्थानिक समुदायांना मोठे फायदे मिळवून देण्याची क्षमता आहे. तुमचे घर सोडण्याआधीच तुम्हाला स्वतःला विशिष्ट भागात प्रोजेक्ट करण्याची आणि भोवतालाशी परिचित करून घेण्याची क्षमता मला नेहमीच मोहवत असते. तुमच्या आसपासचे मार्ग सहजपणे नेव्हिगेट करता येणे जवळपास अशक्य असलेल्या फ्रेंच पॉलिनेशियामध्ये हे विशेष उपयुक्त वाटले.
-
क्रिस्टोफ कोरकॉड, Tahiti 360 चे संस्थापक
मार्ग दृश्य मुळे बेटावरील जीवनाला मिळू शकणारे फायदे ओळखून, ताहिती, मूरिआ, बोरा बोरा, रायाटिया, मोपिटी, हुआहाइन, फाकाराव्हा आणि रँगिरोआ येथील सर्व रस्ते मॅप करणे आणि ते संदर्भित करणे यासाठी स्थानिक प्राधिकरणांनी Tahiti 360 सोबत भागीदारी केली. फ्रेंच पॉलिनेशियाचा १८००किमी भूभाग कव्हर करण्यासाठी, क्रिस्टोफ यांनी सर्व भूप्रदेशांवर चालणारी वाहने, गोल्फ कार्ट, इलेक्ट्रिक बाइक, जेट स्की आणि अगदी घोडेदेखील वापरले. काही प्रमाणात क्रिस्टोफ यांचे कव्हरेज आणि प्राधिकरणांनी शेअर केलेला स्थानिक भौगोलिक डेटा यांमुळे, रहदारीबाबत लाइव्ह अपडेट, सर्वात जलद मार्गासंबंधी सूचना आणि ताहितीमधील स्थानिक व्यवसायांसाठी दिशानिर्देश मिळवणे आता शक्य झाले आहे. याचा परिणाम म्हणून, संपूर्ण बेटावर अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार्या आणीबाणीमधील सेवांसाठी हे विशेष उपयुक्त ठरले आहे. शेवटी, मार्ग दृश्य वरील Tahiti 360 च्या इमेजच्या अॅक्सेसमुळे शहर नियोजन, इमारतींची आणि रस्त्यांची देखभाल या गोष्टीदेखील सुलभ झाल्या आहेत.
UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचा अॅक्सेस
रायाटिया बेटावरील टापुटापुआटिया ही Tahiti 360 ची सर्वाधिक इमर्सिव्ह टूर आहे. दर वर्षी ३,००,००० पेक्षा जास्त अतिथींना फ्रेंच पॉलिनेशियामध्ये आणण्यात हे UNESCO जागतिक वारसा स्थळ मोठी भूमिका बजावते. परंतु, त्याचे सौंदर्य 360 मध्ये कॅप्चर करून, क्रिस्टोफ यांनी ते लाखो लोकांसाठी व्हर्च्युअल पद्धतीने अनुभवण्यासाठी खुले केले. क्रिस्टोफ यांच्या मार्ग दृश्य वर प्रकाशित झालेल्या कामामुळे एक जागतिक आश्चर्य आपल्या स्क्रीनवर आले आहे, जे आपण सर्व जण एक्सप्लोर करू शकतो.
संपूर्ण बेट कव्हर करणे ही लहान कामगिरी नाही, परंतु क्रिस्टोफ ते आव्हान स्वीकारण्यास तयार होते. बोरा बोरा ची सर्व वैशिष्ट्ये 360 मध्ये कॅप्चर केली जातील याची खात्री करण्यासाठी, त्यांनी कार आणि बोट वापरून तसेच पायी चालून बेट कव्हर केले. संपूर्ण बेट मॅप करण्यासाठी आणि त्याचा सर्वांना अनुभव घेता येण्याकरिता ते मार्ग दृश्य वर उपलब्ध करून देण्यासाठी क्रिस्टोफ यांना फक्त सात दिवस लागले.
बोरा बोराव्यतिरिक्त, क्रिस्टोफ यांनी ताहितीची राजधानी पपीटे, त्याचप्रमाणे पायरे या शहराच्या सर्व रस्त्यांचेदेखील फोटो घेतले. दोन्ही शहरांच्या इमेज मार्ग दृश्य वर दिसल्यावर, दृश्यमानतेसंबंधी उत्तम परिणाम मिळाले.
स्थानिक व्यवसायांनादेखील मार्ग दृश्य वर झळकण्याची संधी मिळाली. इंटरकाँटिनेंटल, मनाव्हा आणि हिल्टन यांसारखे मोठे हॉटेल समूह, त्याचप्रमाणे लहान बी अँड बी व्यवसाय त्यांच्या सुविधा जागतिक मंचावर प्रदर्शित करण्याची संधी मिळाल्याने उत्साहित झाले होते.
आवर्जून भेट देण्याच्या गोष्टींमध्ये आणखी गोष्टी जोडणे
अद्याप कव्हर न केलेल्या मोपिटी, टहा, मार्क्वेसस बेटे, गँबिअर्स बेटे आणि ऑस्ट्रल बेटे यांसह, वर्षाच्या अखेरपर्यंत फ्रेंच पॉलिनेशियामधील सर्व बेटे कव्हर करण्याची Tahiti 360 ला आशा आहे. फ्रेंच पॉलिनेशियाचा बराच भूभाग कव्हर करणे अद्याप बाकी असतानाच, क्रिस्टोफ आधीच त्यांच्या पुढील साहसाबद्दल विचार करत आहेत. Somme Tourisme साठी ४००किमी सायकलिंग मार्ग, अमियां येथील हॉर्टिओनाज आणि पर्यटक ट्रेन कव्हर करण्याकरिता, स्वतःच्या मूळ शहरात फ्रेंच स्थानिक प्राधिकरणांसोबत काम करण्यास त्यांनी आधीच सहमती दर्शवली आहे. २०२४ ऑलिंपिक खेळांमधील सर्फिंग इव्हेंटचे होस्ट असलेले टियाहुपू हे स्थानदेखील क्रिस्टोफ कव्हर करणार आहेत. दरम्यानच्या काळात, स्थानिक लोकांसाठी दैनंदिन जीवनात सुधारणा करण्यात आणि हे नंदनवन एक्स्प्लोर करण्यात आणखी लोकांना मदत करण्यासाठी, न्यू कॅलेडोनिया, वॉलिस आणि फ्युच्युना बेटे जोडण्याचीदेखील त्यांना आशा आहे.
मार्ग दृश्य हा सहयोगात्मक प्लॅटफॉर्म आहे, जेथे Google Maps वर इमर्सिव्ह इमेजरी प्रकाशित करून समुदायांना भरभराट होण्यात, व्यवसायांना वाढ होण्यात आणि जागतिक आश्चर्ये घराच्या आणखी जवळ आणण्यात कंट्रिब्युटर मदत करू शकतात. सर्वात चांगले म्हणजे, मार्ग दृश्य सोबत मॅपिंग करून कोणालाही यशस्वी होता येते, ज्यासाठी योगदान देण्याकरिता फक्त पहिले पाऊल उचलावे लागते.
आणखी एक्सप्लोर करा