पेमेंटसाठी Google क्रेडिट कार्ड नंबर कसे वापरते
तुम्ही करत असलेल्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीसाठी, ज्यात Google Play आणि Google Pay व्यवहारांचा समावेश आहे, पेमेंटची सुविधा देण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्याच्या उद्देशांनी Google तुम्ही पुरवलेले क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड नंबर वापरते. आम्ही तुमची पेमेंट आणि खाते माहिती कशी वापरतो याबद्दल Google Payments गोपनीयतेची सूचना तपशीलवार माहिती पुरवते, ज्यात आम्ही गोळा करत असलेली माहिती आणि आम्ही ती कशी शेअर करतो याचा समावेश आहे. आम्ही फक्त Google Payments गोपनीयतेच्या सूचनेमध्ये वर्णन केलेल्या परिस्थितींमध्येच वैयक्तिक माहिती तृतीय पक्षांसोबत शेअर करतो. तुम्ही Google ला पुरवलेले क्रेडिट कार्ड अणि डेबिट कार्ड नंबर एंक्रिप्ट केले जातात आणि सुरक्षित स्थानावर सुरक्षित सर्व्हरमध्ये स्टोअर केले जातात.