आम्ही गोळा करत असलेला डेटा Google कसा राखून ठेवते
तुम्ही Google सेवा वापरत असताना आम्ही डेटा गोळा करतो. आम्ही काय गोळा करतो, आम्ही ते का गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती व्यवस्थापित कशी करू शकता याचे वर्णन आमच्या गोपनीयता धोरण मध्ये केले आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कालावधीसाठी का राखून ठेवतो याचे हे राखून ठेवण्याचे धोरण वर्णन करते.
काही डेटा तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा हटवू शकता, काही डेटा आपोआप हटवला जातो आणि काही डेटा आम्ही गरज असेल तेव्हा जास्त कालावधींसाठी राखून ठेवतो. तुम्ही डेटा हटवता तेव्हा, तुमचा डेटा आमच्या सर्व्हरवरून सुरक्षितपणे आणि पूर्णपणे काढला गेला आहे किंवा केवळ अनामित स्वरूपात राखून ठेवला गेला आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही हटवण्याच्या धोरणाचे पालन करतो. Google डेटा अनामित कसा करते
तुम्ही माहिती काढेपर्यंत ती राखून ठेवली जाते
आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये स्टोअर केलेला डेटा दुरुस्त करू देणाऱ्या किंवा हटवू देणाऱ्या सेवांची श्रेणी देऊ करतो. उदाहरणार्थ, तुम्ही हे करू शकता:
- तुमची वैयक्तिक माहिती संपादित करणे
- माझी ॲक्टिव्हिटी वरील आयटम हटवणे
- फोटो आणि दस्तऐवज यांसारखा आशय हटवणे
- तुमच्या Google खात्यावरील उत्पादन काढणे
- पूर्णपणे तुमचे Google खाते हटवणे
तुम्ही हा डेटा काढेपर्यंत आम्ही तो तुमच्या Google खात्यामध्ये ठेवू. आणि तुम्ही Google खात्यात साइन इन केल्याशिवाय आमच्या सेवा वापरल्या तर तुम्ही आमच्या सेवा ॲक्सेस करण्यासाठी काय वापरता, जसे की डिव्हाइस, ब्राउझर किंवा ॲप, याच्याशी लिंक केलेली काही माहिती हटवण्याची क्षमतादेखील आम्ही तुम्हाला देऊ करतो.
एका विशिष्ट कालावधीनंतर मुदत संपणारा डेटा
काही बाबतींत, डेटा हटवण्याचा एखादा मार्ग पुरवण्यापेक्षा, आम्ही तो पूर्वनिर्धारित कालावधीसाठी स्टोअर करतो. प्रत्येक प्रकारच्या डेटासाठी, आम्ही त्याच्या संकलनाच्या कारणाच्या आधारावर स्टोरेजच्या कालमर्यादा सेट करतो. उदाहरणार्थ, आमच्या सेवा अनेक विविध प्रकारच्या डिव्हाइसवर योग्य प्रकारे दिसतात याची खात्री करण्यासाठी, आम्ही ब्राउझरची रुंदी आणि उंची ९ महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकतो. ठरावीक डेटा निश्चित कालावधींमध्येअॅनोनिमाइझ किंवा सुडोनिमाइझ करण्यासाठीदेखील आम्ही पावले उचलतो. उदाहरणार्थ, आम्ही ९ महिन्यांनंतर आयपी ॲड्रेसचा भाग आणि १८ महिन्यांनंतर कुकीसंबंधी माहिती काढून टाकून सर्व्हर लॉगमधील जाहिरात डेटा ॲनोनिमाइझ करणे हे करतो. आम्ही निश्चित कालावधीसाठी सुडोनिमाइझ केलेला डेटादेखील स्टोअर करू शकतो, जसे की Google खाते वरून डिस्कनेक्ट केल्या गेलेल्या क्वेरी.
तुमचे Google खाते हटवले जाईपर्यंत राखून ठेवली जाणारी माहिती
वापरकर्ते आमच्या वैशिष्ट्यांशी कसा परस्परसंवाद साधतात आणि आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा कशी करू शकतो हे समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी उपयुक्त असल्यास, आम्ही काही डेटा तुमचे Google खाते कायम असेपर्यंत राखून ठेवतो. उदाहरणार्थ, तुम्ही Google Maps मध्ये शोध घेतलेला पत्ता हटवल्यास, तुमचे खाते तरीही तुम्ही दिशानिर्देश वैशिष्ट्य वापरल्याचे स्टोअर करेल. अशा प्रकारे, Google Maps तुम्हाला भविष्यामध्ये दिशानिर्देश वैशिष्ट्य कसे वापरायचे ते दाखवणे टाळू शकते.
मर्यादित उद्देशांकरिता दीर्घ कालावधीसाठी राखून ठेवलेली माहिती
काही वेळा व्यावसायिक आणि कायदेशीर आवश्यकतांमुळे आम्हाला काही माहिती, विशिष्ट उद्देशांकरिता, दीर्घ कालावधीसाठी राखून ठेवणे भाग असते. उदाहरणार्थ, Google तुमच्यासाठी एखाद्या पेमेंटवर प्रक्रिया करते तेव्हा किंवा तुम्ही Google ला पेमेंट करता तेव्हा, कर आणि लेखापरीक्षणाच्या उद्देशांनी आम्ही हा डेटा आणखी जास्त कालावधींसाठी राखून ठेवू. आम्ही काही डेटा कदाचित आणखी जास्त कालावधींसाठी राखून ठेवण्याच्या कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- सुरक्षितता, फसवणूक आणि गैरवापर प्रतिबंध
- आर्थिक नोंदी ठेवणे
- कायदेशीर किंवा नियामक आवश्यकतांचे पालन करणे
- आमच्या सेवांच्या सातत्याची खात्री करणे
- Google सोबत थेट संवाद साधणे
सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवणे शक्य करणे
तुम्ही तुमच्या Google खात्यामधील डेटा हटवता तेव्हा, आम्ही तो उत्पादनांमधून आणि आमच्या सिस्टममधून काढण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करतो. प्रथम, डेटा तात्काळ व्ह्यूमधून काढणे आणि त्यापुढे तो तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी वापरला जाऊ नये हे आमचे लक्ष्य असते. उदाहरणार्थ, तुमच्या माझी ॲक्टिव्हिटी डॅशबोर्डवरून पाहिलेला एखादा व्हिडिओ तुम्ही हटवल्यास, YouTube तात्काळ त्या व्हिडिओसाठी तुमची पाहण्याची प्रगती दाखवणे थांबवेल.
त्यानंतर आम्ही आमच्या स्टोरेज सिस्टममधून डेटा सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी डिझाइन केलेली प्रक्रिया सुरू करतो. आमच्या वापरकर्त्यांचे आणि ग्राहकांचे आकस्मिक डेटा हानीपासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षितपणे हटवले जाणे महत्त्वाचे आहे. आमच्या सर्व्हरवरून डेटा संपूर्ण हटवला जाणे वापरकर्त्यांच्या मनःशांतीसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेला हटवण्याच्या वेळेपासून साधारणपणे सुमारे २ महिने लागतात. डेटा अनावधानाने काढला गेला असल्यास यामध्ये बरेचदा महिन्याभराच्या रीकव्हरी कालावधीचा समावेश असतो.
ज्यावरून डेटा हटवला जातो त्या प्रत्येक Google स्टोरेज सिस्टमकडे सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी तिची स्वतःची तपशीलवार प्रक्रिया असते. यामध्ये सर्व डेटा हटवला गेला आहे याची निश्चिती करण्यासाठी सिस्टममधून तो पुनःपुन्हा पार करणे किंवा चुका दुरुस्त करता येण्यासाठी संक्षिप्त विलंब यांचा समावेश असतो. याचा परिणाम म्हणून, काही वेळा डेटा सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी अतिरिक्त वेळेची गरज असते तेव्हा हटवण्यासाठी आणखी जास्त वेळ लागू शकतो.
संभाव्य संकटांपासून रीकव्हर होण्यात मदत होण्यासाठी संरक्षणाची दुसरी पातळी म्हणून आमच्या सेवा एंक्रिप्ट केलेले बॅकअप स्टोरेजदेखील वापरतात. या सिस्टमवर डेटा ६ महिन्यांपर्यंत राहू शकतो.
कोणत्याही हटवण्याच्या प्रक्रियेप्रमाणे, नेहमीची देखभाल, अनपेक्षित आउटेज, बग किंवा आमच्या प्रोटोकॉलमधील अपयश यांसारख्या गोष्टींमुळे या लेखात परिभाषित केलेल्या प्रक्रियांना आणि कालमर्यादांना विलंब होऊ शकतो. आमच्याकडे अशा समस्या शोधण्यासाठी आणि त्यांवर उपाय करण्यासाठी डिझाइन केलेल्या सिस्टम आहेत.
सुरक्षितता, फसवणूक आणि गैरवापर प्रतिबंध
वर्णन
फसवणूक, गैरवापर आणि अनधिकृत ॲक्सेसपासून तुमचे, इतर लोकांचे आणि Google चे संरक्षण करण्यासाठी.
प्रसंग
उदाहरणार्थ, जेव्हा कोणीतरी जाहिरात फसवणूक करत आहे असा Google ला संशय आल्यावर.
आर्थिक नोंदी ठेवणे
वर्णन
Google ने तुमच्या पेमेंटवर प्रक्रिया करणे किंवा तुम्ही Google ला पेमेंट करणे यांच्या समावेशासह, Google एखाद्या आर्थिक व्यवहारातील पक्ष असताना. लेखापरीक्षण, विवाद निराकरण आणि कर, सरकारजमा करणे, मनी लोंडरिंग-विरोधी आणि इतर आर्थिक नियमांचे पालन यांसारख्या उद्देशांनी ही माहिती दीर्घकाळ राखून ठेवण्याची बरेचदा गरज असते.
प्रसंग
उदाहरणार्थ, तुम्ही Play स्टोअर वरून ॲप्स किंवा Google Store वरून उत्पादने खरेदी करता तेव्हा.
कायदेशीर किंवा नियामक आवश्यकतांचे पालन करणे
वर्णन
कोणतेही लागू कायदे, नियम, कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणीयोग्य शासकीय विनंती यांची पूर्तता करण्यासाठी किंवा लागू सेवा अटींची, संभाव्य उल्लंघनांच्या तपासाच्या समावेशासह, अंमलबजावणी करण्यासाठी गरज असताना.
प्रसंग
उदाहरणार्थ, Google ला कायदेशीर साक्षीसमन्स मिळाल्यास.
आमच्या सेवांच्या सातत्याची खात्री करणे
वर्णन
तुम्हाला आणि इतरांना सेवा सातत्याने मिळत राहील याची खात्री करण्यासाठी.
प्रसंग
उदाहरणार्थ, तुम्ही इतर वापरकर्त्यांसोबत माहिती शेअर केल्यावर (जसे की तुम्ही इतर कोणाला मेल पाठवलेला असतो तेव्हा), ती तुमच्या Google खात्यावरून हटवल्याने मिळवणाऱ्यांनी राखून ठेवलेल्या तिच्या प्रती काढून टाकल्या जाणार नाहीत.
Google सोबत थेट संवाद साधणे
वर्णन
तुम्ही Google सोबत ग्राहक साहाय्य चॅनेल, फीडबॅक फॉर्म किंवा बग रिपोर्ट यांमधून थेट संवाद साधल्यास, Google त्या संवादांच्या वाजवी नोंदी राखून ठेवू शकते.
प्रसंग
उदाहरणार्थ, तुम्ही Gmail किंवा ड्राइव्ह यांसारख्या Google ॲपमध्ये फीडबॅक पाठवता तेव्हा.