Google माझ्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते आणि माझी माहिती कसे सुरक्षित ठेवते?
आम्हास माहित आहे की सुरक्षितता आणि गोपनीयता आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत – आणि त्या आमच्यासाठी देखील, महत्त्वाच्या आहेत. आपली माहिती सुरक्षित आहे आणि आपल्याला तिची आवश्यकता असेल तेव्हा ती प्रवेश करता येणारी असेल याचा आपल्याला आत्मविश्वास आणि मजबूत सुरक्षितता देण्यास आम्ही प्राधान्य देतो.
मजबूत सुरक्षेची खात्री करण्यासाठी, तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आणि तुमच्याकरिता Google ला आणखी प्रभावी व कार्यक्षम बनवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आम्ही सुरक्षिततेवर दरवर्षी लक्षावधी डॉलर खर्च करतो आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा सुरक्षेच्या क्षेत्रामधले जगातले विख्यात तज्ञ नियुक्त करतो. आम्ही Google Dashboard, २-टप्पी पडताळणी आणि माझे Ad केंद्र मधील पर्सनलाइझ केलेल्या जाहिरात सेटिंग्ज यांसारखी वापरण्यास सोपी गोपनीयता व सुरक्षा टूलदेखील वापरतो, म्हणून Google सह शेअर करत असलेल्या माहितीबाबत तुम्ही नियंत्रक असता.
आपण आपल्या स्वतःस आणि आपल्या कुटुंबास ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवावे त्यासह ऑनलाइन सुरक्षितता आणि संरक्षणाविषयी, आमच्या Google सुरक्षितता केंद्रावर अधिक जाणून घेऊ शकता.
आम्ही आपली वैयक्तिक माहिती खाजगी आणि सुरक्षित कशी ठेवतो — आणि आपल्याला नियंत्रण कसे प्रदान करतो त्याविषयी अधिक जाणून घ्या.
माझे खाते एखाद्या प्रदेशाशी का संलग्न केले आहे?
आम्हाला या अनेक गोष्टी निर्धारित करता याव्यात, यासाठी तुमचे खाते सेवा अटी यांमधील प्रदेशाशी संलग्न केले आहे:
- Google ची अनुषंगिक कंपनी/संस्था जी सेवा पुरवते, तुमच्या माहितीवर प्रक्रिया करते आणि ते लागू असलेल्या गोपनीयता कायद्यांचे पालन करण्यास जबाबदार आहे. सामान्यत:, Google दोनपैकी एका कंपनीमार्फत ग्राहक सेवा पुरवते:
- Google Ireland Limited, तुम्ही युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EU देशांसह आईसलंड, लिक्टनस्टाइन आणि नॉर्वे) किंवा स्विर्त्झलंडमध्ये असल्यास
- उर्वरित जगासाठी, Google LLC, युनायटेड स्टेट्स मध्ये स्थित
- आमच्या संबंधांवर शासन करणाऱ्या अटींची आवृत्ती, जी स्थानिक कायद्यानुसार वेगळी असू शकते
- तुम्ही राहता त्या प्रदेशानुसार Google सेवांसाठी आवश्यकता लागू करणे
तुमच्या खात्याशी संलग्न प्रदेश निर्धारित करणे
तुम्ही नवीन खाते तयार करता, तेव्हा तुम्ही तुमचे Google खाते कुठे तयार केले आहे यानुसार आम्ही तुमचे खाते त्या प्रदेशाशी संलग्न करतो. किमान एक वर्ष जुन्या खात्यांसाठी, आम्ही असे प्रदेश वापरतो ज्यामधून तुम्ही सहसा Google सेवा ॲक्सेस करता — साधारणपणे तुम्ही मागील वर्षामध्ये सर्वाधिक वेळ जिथे घालवला आहे.
साधारणपणे वारंवार प्रवासाचा तुमच्या खात्याशी संलग्न असलेल्या प्रदेशावर परिणाम होत नाही. तुम्ही नवीन प्रदेशामध्ये स्थलांतर केल्यास, तुम्ही ज्या प्रदेशाशी संलग्न आहात ते अपडेट होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकेल.
तुमच्या खात्याशी संलग्न असलेला प्रदेश तुम्ही राहत असलेल्या देशाशी जुळत नसल्यास, हे तुमच्या कामाच्या आणि राहण्याच्या प्रदेशातील फरकामुळे, तसेच तुम्ही तुमचा आयपी अॅड्रेस मास्क करण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) इंस्टॉल केल्यामुळे किंवा तुम्ही प्रादेशिक सीमेजवळ राहत असल्यामुळे असू शकते. तुम्ही तुमच्या खात्याशी संलग्न असलेल्या प्रदेशाबाबत असहमत असल्यास, तुमचा प्रदेश बदलणे हे करण्यासाठी त्या संदर्भातील विनंती सबमिट करा.
मी Google च्या शोध परिणामांमधून माझ्या स्वतःविषयीची माहिती कशी काढू शकतो?
Google शोध परिणाम हे वेबवर सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या सामग्रीचे प्रतिबिंब आहेत. शोध इंजिन थेट वेबवरून सामग्री काढू शकत नाहीत, म्हणून Google वरून शोध परिणाम काढण्याने वेबवरील सामग्री काढली जाणार नाही. आपण वेबवरून काहीतरी काढू इच्छित असल्यास, आपण सामग्री पोस्ट केलेल्या साइटच्या वेबमास्टरशी संपर्क साधावा आणि त्याला किंवा तिला बदल करण्यास सांगा. एकदा सामग्री काढली गेली आणि Google ने अद्यतनाची टिप घेतल्यास, माहिती यापुढे Google च्या शोध परिणामांमध्ये दिसणार नाही. आपल्याकडे तातडीची काढण्याची विनंती असल्यास, आपण अधिक माहितीसाठी आमच्या मदत पृष्ठास भेट द्या.
मी Google शोध परिणामांवर क्लिक करतो तेव्हा माझ्या शोध क्वेरी वेबसाइटवर पाठविल्या जातात?
सामान्यतः नाही. तुम्ही Google Search मधील शोध परिणामावर क्लिक करता, तेव्हा तुमचा वेब ब्राउझर डेस्टिनेशन वेबपेजवर विशिष्ट माहिती पाठवतो. तुमच्या शोध संज्ञा या शोध परिणाम पेजच्या इंटरनेट ॲड्रेसमध्ये किंवा URL मध्ये दिसू शकतात, पण ती URL डेस्टिनेशन पेजवर रेफरर URL म्हणून पाठवण्यापासून ब्राउझरना रोखणे हा Google Search चा उद्देश आहे. आम्ही Google Trends आणि Google Search Console द्वारे शोध क्वेरीशी संबंधित डेटा पुरवतो, पण आम्ही असे करतो, तेव्हा ॲग्रिगेट केलेल्या क्वेरी एकत्रित करतो, जेणेकरून आम्हाला फक्त अशा क्वेरी शेअर करता येतील ज्या एकाहून अधिक वापरकर्त्यांनी जारी केल्या आहेत.