दृष्टिदोष असणाऱ्या किंवा दृष्टिहीन लोकांना काम अधिक जलद आणि अधिक सहजतेने करण्यात साहाय्य करण्यासाठी Lookout हे कॉंप्युटर व्हिजन आणि जनरेटिव्ह AI वापरते. तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून, Lookout हे तुमच्या भोवतालच्या जगाबद्दल अधिक माहिती मिळवणे आणखी सोपे करते आणि मजकूर व दस्तऐवज वाचणे, मेल क्रमाने लावणे, किराणा सामान ठेवणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींसारखी दैनंदिन कामे अधिक परिणामकारकरीत्या करण्यात मदत करते.
दृष्टिहीन आणि दृष्टिदोष असणाऱ्या व्यक्तींच्या समुदायाच्या सहयोगाने तयार केलेले, Lookout हे जगभरातील माहिती जगातील सर्वांसाठी अॅक्सेसिबल करणे या Google च्या ध्येयाला सपोर्ट करते.
Lookout हे सात मोड देऊ करते:
• <b>मजकूर:</b> मेल क्रमाने लावणे आणि चिन्हे वाचणे यांसारख्या गोष्टी करत असताना, मजकूर मोड वापरून मजकूर स्कॅन करा व तो मोठ्याने वाचला जाताना ऐका.
• <b>दस्तऐवज:</b> दस्तऐवज मोड वापरून मजकूर किंवा हस्तलेखनाचे पूर्ण पेज कॅप्चर करा. ३० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध.
• <b>एक्सप्लोर करा:</b> एक्सप्लोर मोड वापरून आसपासच्या परिसरातील वस्तू, लोक आणि मजकूर ओळखा.
• <b>चलन:</b> यूएस डॉलर, युरो आणि भारतीय रुपये यांसाठी सपोर्टसह, चलन मोड वापरून बँकनोट झटपट व विश्वासार्हरीत्या ओळखा.
• <b>फूड लेबल:</b> फूड लेबल मोड वापरून पॅकेज केलेले खाद्यपदार्थ त्यांच्या लेबलद्वारे किंवा बारकोडद्वारे ओळखा. २० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध.
• <b>शोध:</b> शोध मोड वापरून दरवाजे, बाथरूम, कप, वाहने आणि आणखी बऱ्याच गोष्टींसारख्या वस्तू शोधण्यासाठी आसपासचा परिसर स्कॅन करा. डिव्हाइसच्या क्षमतांनुसार, शोध मोड तुम्हाला वस्तूची दिशा आणि अंतरदेखील सांगू शकतो.
• <b>इमेज:</b> इमेज मोड वापरून इमेज कॅप्चर करा, तिचे वर्णन करा आणि तिच्याबद्दल प्रश्न विचारा. इमेजची वर्णने फक्त इंग्रजीत. इमेजसंबंधी प्रश्न आणि उत्तर फक्त यूएस, यूके आणि कॅनडामध्ये.
Lookout हे ३० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि Android 6 व त्यावरील आवृत्ती असलेल्या डिव्हाइसवर रन होते. २GB किंवा त्याहून अधिक RAM असलेल्या डिव्हाइसची शिफारस केली जाते.
मदत केंद्र वर Lookout विषयी अधिक जाणून घ्या:
https://support.google.com/accessibility/android/answer/9031274