Sound Amplifier हे फक्त तुमचा Android फोन आणि हेडफोन वापरून, कमी ऐकू येणार्या लोकांमध्ये दैनंदिन संभाषणे आणि आसपासचे आवाज अधिक अॅक्सेसिबल बनवते. तुमच्या सभोवतालचे आणि तुमच्या डिव्हाइसवरील आवाज फिल्टर, ऑगमेंट आणि अँप्लिफाय करण्यासाठी Sound Amplifier वापरा.
वैशिष्ट्ये• स्पीच आणखी चांगल्यारीतीने ओळखण्यासाठी अवांछित आवाज कमी करणे.
• संभाषण मोडसह गोंगाटाच्या वातावरणात स्पीकरच्या आवाजावर लक्ष केंद्रित करणे. (Pixel 3 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध.)
• संभाषणे, टीव्ही किंवा व्याख्याने ऐका. दूर असलेल्या ऑडिओ स्रोतांसाठी, ब्लूटूथ हेडफोनची शिफारस केली जाते. (ब्लूटूथ हेडफोनमध्ये आवाज ट्रान्समिट व्हायला उशीर होऊ शकतो)
• तुमच्या डिव्हाइसवर आसपासचे संभाषण किंवा मीडिया प्ले करण्यासाठी तुमचा ऐकण्याचा अनुभव पर्सनलाइझ करा. तुम्ही आवाज कमी करू शकता किंवा कमी फ्रिक्वेन्सी, उच्च फ्रिक्वेन्सी किंवा शांत आवाज वाढवू शकता. दोन्ही कानांसाठी किंवा प्रत्येक कानाकरिता स्वतंत्रपणे तुमची प्राधान्ये सेट करा.
• अॅक्सेसिबिलिटी बटण, जेश्चर किंवा क्विक सेटिंग्ज वापरून Sound Amplifier सुरू आणि बंद करा. अॅक्सेसिबिलिटी बटण, जेश्चर आणि क्विक सेटिंग्ज बद्दल अधिक जाणून घ्या:
https://support.google.com/accessibility/android/answer/7650693आवश्यकता• Android 8.1 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध.
• तुमचे Android डिव्हाइस हेडफोनसह पेअर करा.
• संभाषण मोड सध्या Pixel 3 आणि त्यावरील आवृत्तीसाठी उपलब्ध आहे.
Sound Amplifier संबंधित तुमचा फीडबॅक आम्हाला ईमेलद्वारे पाठवा: sound-amplifier-help@google.com. Sound Amplifier वापरण्यासंबंधित मदतीसाठी
https://g.co/disabilitysupport वर आमच्याशी संपर्क साधा.
परवानग्या सूचना•
मायक्रोफोन: मायक्रोफोनचा अॅक्सेस Sound Amplifier ला अँप्लिफिकेशन आणि फिल्टर करण्यासाठी ऑडिओवर प्रक्रिया करण्यास अनुमती देईल. कोणताही डेटा गोळा किंवा स्टोअर केला जात नाही.
•
अॅक्सेसिबिलिटी सेवा: हे अॅप अॅक्सेसिबिलिटी सेवा असल्याने, ते तुमच्या कृतींचे निरीक्षण करू शकते, विंडो आशय मिळवू शकते आणि तुम्ही टाइप केलेला मजकूर पाहू शकते.